Friday, September 25, 2026
Latest:
रत्नागिरीराजकीय

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी स्वप्नील शिंदे यांची फेरनिवड शहराध्यक्षपदी सिद्धेश लाड सचिवपदी अक्षय केदारी यांची निवड..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि.०४: राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या चिपळूण तालुकाध्यक्षपदी स्वप्निल शिंदे यांची फेरनिवड तर शहराध्यक्ष सिद्धेश लाड व सचिवपदी अक्षय केदारी यांची निवड जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के यांनी जाहीर केली आहे. या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, विधानसभा क्षेत्राध्यक्ष दादा साळवी, माजी सभापती शौकत मुकादम आदींनी अभिनंदन केले आहे. हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिपळुणातील संपर्क कार्यालयात झाला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची योगेश शिर्के यांनी  जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर कोरोना संकटाच्या काळातही रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करीत युवक कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत संवाद साधला आणि कार्यकर्त्यांना पक्षवाढीसाठी प्रोत्साहन दिले. याचबरोबर काही तालुक्यांचे अध्यक्ष घोषित केले. तर शुक्रवारी चिपळूण तालुकाध्यक्षपदी स्वप्नील शिंदे यांची फेरनिवड केली. तर चिपळूण शहराध्यक्षपदी सिद्धेश लाड व सचिवपदी अक्षय केदारी यांची निवड केली. या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले. हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिपळुणातील संपर्क कार्यालयात झाला.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. राकेश चाळके,  जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के, बेसिक चिपळूण शहराध्यक्ष मिलिंद कापडी, मनोज जाधव, खालीद दाभोळकर, माजी उपसभापती राजाराम चाळके, सचिन पाटेकर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष साहिल आरेकर, मयूर खेतले,  तुषार गमरे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी शहराध्यक्ष दीपिका कोतवडेकर, सचिन साडविलकर, विद्यार्थी तालुकाध्यक्ष वात्सल्य शिंदे, युवती शहराध्यक्ष ऋतुजा चौगुले जानवी फोंडकर, शैला पवार, रूपेश इंगवले, मिनेश कापडी, विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष शेबाज कटमाले, राहुल शिंदे, मंदार पटेकर, मंदार चिपळूणकर, करण जाधव, समीर पवार, शैलेश चव्हाण, प्रतीक शिंदे, खालीद पटाईत आदी उपस्थित होते. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी आमदार शेखर निकम, तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, चिपळूण शहराध्यक्ष मिलिंद कापडी, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के आधी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणे प्रयत्न करू अशी सर्वांना ग्वाही दिली.

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IJOGnULTOy78rfR0Mo6Uk2

_😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे *सुर्या गॅस*_

     *🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_

*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*

🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.

*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!