वैभववाडीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

वैभववाडी तहसिलदार कार्यालयासमोर उद्या अरुणा प्रकल्पग्रस्तांचे लक्षवेधी आमरण उपोषण..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.०४: कोरोना महामारीचा फायदा घेऊन प्रकल्प अधिकारी राजन डवरी यांनी धरणाची दुसऱ्या टप्प्याची घळभरणी आणि पिचींग ची कामे पुर्ण केली आहेत. केंद्र आणि राज्यसरकारने अरुणा प्रकल्पाला अमाप निधी दिलेला आहे. परंतु कायद्याप्रमाणे पुनर्वसन गावठणात देय असलेल्या नागरी सुविधांची कामे पुर्ण पणे ठप्प झालेली आहेत. मग अरुणा प्रकल्पाला मंजुर असलेला निधी गेला कुठे? असा सवाल उपस्थित करीत उद्या ५ फेब्रुवारी २०२१ रोजी आखवणे, नागपवाडी, भोम गावातील धरणात घरे बुडालेले प्रकल्पग्रस्त तहसिलदार वैभववाडी यांच्या कार्यालयासमोर आपल्या विविध न्याय मागण्यांच्या पुर्तते साठी लक्षवेधी आमरण उपोषणला बसणार आहेत.

लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा संघटनेच्या वतीने १ फेब्रुवारी २०२१ रोजी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना पत्र देऊन आमरण उपोषण करणार असल्याचे कळविले होते. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाऐवजी अरुणा प्रकल्पग्रस्तांचे हे उपोषण तहसिलदार वैभववाडी यांच्या कार्यालयासमोर होणार आहे.

या बाबात प्रकल्पग्स्तांच्या शिष्टमंडळाने तहसिलदार रामदास झळके यांची आज दिनाक ४ फेब्रुवारी २०२१ रोजी भेट देऊन चर्चा केली. या शिष्टमंडळात लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्थित्वाचा संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे, प्रकाश सावंत, संघटनेचे सेक्रेटरी अजय नागप, खजीनदार विलास कदम, याच्या सह सुरेश नागप,पांडुरंग जाधव, मुकेश कदम श्रीकांत बांद्रे, वामन बांद्रे, जयराम कदम राजा कांबळे आदिंचा समावेश होता.

गेली पावणे दोन वर्ष अरुणा प्रकल्पग्रस्तांची सुमारे १३० घरे धरणाच्या पाण्यात बुडालेली आहेत २०१३ च्या नव्या भुसंपादन कायद्यास पात्र असताना अरुणा प्रकल्पग्रस्तांना १८९४ च्या कायद्यांने तुटपुंजा मोबदला देण्यात आलेला आहे. त्रुटीच्या नावाखाली बुवा सह गावातील तिन पुढा-यानी आपल्या नातेवाईकांची घरे भरली आहेत. मात्र गरिब प्रकल्पग्रस्तांच्या त्रुटी अद्याप नोंदविण्यात आल्या नाहीत. पुनर्वसन गावठणातील प्रकल्पग्रस्तांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. पुनर्वसन गावठणे मरनासन्न आहेत. अनेक प्रकल्पग्रस्त पात्र असुनही त्यांना अद्याप निवासी भुखंड देण्यात आलेले नाहीत. अनेक प्रकल्पग्रस्तांना भुखंडाच्या ताबा पावत्याच देण्यात आलेल्या नाहीत. प्रकल्पाची पाण्यात घरे बुडाल्या नंतर काही बेघर प्रकल्पग्रस्तांना रुपये १५०००/- घर भाड्यासाठी तातडीची रक्कम वाटप करण्यात आली. परंतु अनेक बेघर प्रकल्पग्रस्तांचे घरभाडे प्रलंबीत आहे. अरुणा प्रकल्पग्रस्तांची पर्यायी शेतजमीनीच्या बाबतीत फसवणुक करण्यात आलेली आहे. गावातील बुवासह तिन दलालांचे बंगले ऊभे राहीले आहेत परंतु गरिब प्रकल्पग्रस्तांकडे आज घर बांधायला ही पैसा नाही. या सर्व प्रकाराला कंटाळुन अरुणा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त शांताराम नागप यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे.

अरुणा प्रकल्पग्रस्तांचे हे व इतर प्रशन सोडवण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधुन घेण्यासाठी ५ फेब्रुवारी २०२१ रोजी अरुणा प्रकल्पग्रस्तांचे लक्षवेधी आंदोलन होणार आहे.

विशेष म्हणजे नरडवे धरण ग्रस्तांचे नेते सुरेश ढवळ,दिवाकर राणे,जगदीश पवार श्री. डीसोजा तसेच अरुणा प्रकल्प संघटनेचे मुबई पदाधीकारी सुर्यकांत नागप,रामचंद्र नागप,मनोहर तळेकर,अशोक नागप,राजु नागप आदी पदाधीकारी अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या लक्षवेधी आंदोलनाला उपस्थित रहाणार आहेत.

*_🔥आम्ही आपल्याला देऊ बारा लाखात घर..🔥_*

⚡आपल्याला हक्काचे घर🏠 हवे आहे? आपण घराच्या🏡 शोधात आहात? आपल्याकडे जमवलेली पुंजी💰 कमी पडत आहे? निराश होऊ नका!😊

*💫सावंतवाडी शहरापासून हाकेच्या अंतरावर आम्ही आपल्या देऊ बारा लाखात साडे पाचशे स्क्वेअर फुट सदनिका, तसेच सावंतवाडी शहरात व शहराच्या आसपास एन ए प्लॉट उपलब्ध..🤝*

🙅🏻‍♂️कोणतीही कायदेशीर कटकट नाही. सगळे व्यवहार पारदर्शी!💥

*😊व्यवहार पूर्ण होईपर्यंत व ताबा मिळेपर्यंत आम्ही देणार आहोत सर्व प्रकारची मदत..🙌*

💫चला तर मग! आपले स्वप्न सत्यात उतरवा..⚡

_*🤷🏻‍♂️संपर्क : सीताराम गावडे*_
_*संपादक कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल,*_
न्यू सबनिसवाडा, बिरोडकरटेंब, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
_*🙋🏻‍♂️मोबाईल ⬇️*_
_*📱8484827993*_
_*📱9423304856*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!