प्रकल्पग्रस्तांची थट्टा उडवू पाहाणाऱ्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना व ठेकेदाराला अरुणा प्रकल्पग्रस्तांचा दणका..

▪️पाणी बंद तर काम बंद; प्रकल्पग्रस्तांचा इशारा

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.०९: प्रकल्पग्रस्तांची थट्टा उडवू पाहाणा-या जलसंपदा विभागाच्या अधिका-यांना आणि ठेकेदाराला अरुणा प्रकल्पग्रस्तांनी आक्रमक होत चांगलाच दणका दिल्यानंतर गेले दोन दिवसांपासून प्रकल्पाच्या पिचींगचे आणि कालव्याची कामे पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहेत. सुमारे १५ वर्षानंतर प्रकल्पस्थळी कामे बंद असल्याने सामसूम आहे. ‘पाणी बंद तर काम बंद’ असा इशारा देत लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे यांच्यासह सहका-यांनी दिला आहे. विकासाला आमचा विरोध नाही. धरण प्रकल्पालाही कुणी विरोध केला नव्हता. परंतु प्रकल्पग्रस्तांच्या असह्यतेचा,अज्ञानाचा फायदा उठवून जलसंपदा, पुनर्वसन ठेकेदार आदी विभागाच्या अधिकार्‍यांनी गावातील दलालांच्या मदतीने आखवणे, नागपवाडी, भोम गावच्या प्रकल्पग्रस्तांवर जो अमानुषपणे अन्याय केलेला आहे याची तक्रारही आपण लवकरच दिल्लीला जावून प्रधान मंत्री सिंचाई योजनेच्या मुख्य अधिका-यांना भेटून करणार आहेत. असे संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे व पदाधिका-यांनी सांगितले.
अरुणा प्रकल्पाच्या पाण्याचा विसर्ग गेल्या महिना भरापासून मोठ्या प्रमाणात सुरु ठेवण्यात आला होता. त्यामुळे अरुणा धरणात बुडालेली घरे दिसू लागताच पाण्याचा विसर्ग अचानक पूर्णपणे बंद करण्यात आला होता. मात्र धरणाची विविध कामे चालू होती. या विरोधात उपोषणकर्ते आक्रमक होत पाणी बंद तर काम बंद असा इशारा देत १५ वर्षानंतर पहिल्यांदा प्रकल्पस्थळी काम बंद करण्यात आल्याने प्रकल्पस्थळ सामसुम आहे. हा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाचा विजय मानला जात आहे.

दरम्यान येत्या आठ दिवसात अरुणा प्रकल्पाच्या पाण्याचा विसर्ग सुरु करा. बुडालेल्या घरांचा पंचनामा करा. सर्व पुनर्वसन गावठाणात ठप्प असलेली विविध विकासाची कामे सुरू करा. बेघर प्रकल्पग्रस्तांना थकीत घरभाडे द्या. या व इतर मागण्यांची पूर्तता न केल्यास शिवाजी चौक पुणे येथील महालक्ष्मी इन्फ्राप्रोजेक्टच्या कार्यालयावरच अरुणा प्रकल्पग्रस्त प्राणांतिक आक्रोश आमरण उपोषणास बसणार आहेत. असा निर्णय लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा संघटनेने घेतला आहे.

जिल्हयातील कार्यकारी अभियंता आणि अधिक्षक अभियंता यांनी अरुणा प्रकल्पात केलेल्या पापामुळे प्रकरण अंगलट येणार हे लक्षात आल्याने त्यांनी बदली करुन पळ काढला आहे. जबाबदार अधिकारी उपलब्ध नसल्याने आम्ही दाद कुणाकडे मागायची महालक्ष्मी इन्फ्राप्रोजेक्टस् शिवाय आता पर्याय नसल्याने अरुणा प्रकल्पग्रस्त आता पुणे येथील ठेकेदाराच्या कार्यालयावर थेट आक्रोश आंदोलन, आमरण उपोषण करुन १३० प्रकल्पग्रस्तांच्या बुडालेल्या घराबद्दल दाद मागणार आहेत. कार्यकारी अभियंता राजन डवरी आणि गावातील बुवासह तिन दलालांच्या प्रतिकात्मक तिरडीसह आक्रोश आंदोलन करण्यात येणार असल्याचे लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे, प्रकाश सावंत, सेक्रेटरी अजय नागप, विलास कदम, पांडुरंग जाधव, मुकेश कदम, जयराम कदम, राजा कांबळे यांनी सांगितले.

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!