वैभववाडीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

वैभववाडीचे नूतन पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांची लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा संघटनेशी चर्चा..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.०३: येथील पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांची अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या वतीने लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे, मुंबई अध्यक्ष  प्रकाश सावंत, सेक्रेटरी अजय नागप, उपाध्यक्ष संतोष चव्हाण  पांडुरंग जाधव, मुकेश कदम,  राजा कांबळे, महिला आघाडीच्या अध्यक्ष सुचिता चव्हाण, सचिव आरती कांबळे, तसेच सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र जाधव, डि.के. सुतार, अशोक राणे यांच्या शिष्टमंडळाने २ जानेवारी २०२१ रोजी भेट घेवून अरुण प्रकल्पग्रस्तांवर झालेल्या अन्यायाची चर्चा केली.

मोबदला नाही, भुखंड नाही. पुनर्वसनाचा पत्ता नाही. कालवे तयार नसताना अरुणा प्रकल्पाची बेकायदेशीर घरभरणी करून प्रकल्पात पाणीसाठा केल्याने अरुणा प्रकल्पग्रस्तांची सुमारे १३० घरे प्रकल्पाच्या पाण्यात बुडालेली आहेत.

सध्या पाण्याचा विसर्ग सुरू केलेला होता. आणखी दोन दिवस पाणी सुरू राहिले असते तर गावातील अनेक घरे पाण्याची पातळी कमी झाल्याने दिसायला लागली असती परंतु ज्या अधिकाऱ्यांनी हे पाप केलेले आहे ते आपल्या अंगलट येईल म्हणून २ जानेवारी २०२१ रोजी पाण्याचा विसर्ग तातडीने बंद करण्यात आला आहे. ही सर्व माहिती वैभववाडी तालुक्याचे नूतन पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना देण्यात आली.

अरुणा प्रकल्पग्रस्तांवर मोबदला वाटपात अन्याय झालेला आहे. पुनर्वसन गावठाणातील विकास कामे प्रलंबित आहेत. धरणाच्या पाण्यात बुडालेल्या घरांचा निर्णय होत नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्त अस्वस्थ आहेत. दुर्दैवाने एका प्रकल्पग्रस्तांने अलीकडेच आत्महत्या केलेली आहे. आदी बाबत तानाजी कांबळे, प्रकाश सावंत, अजय नागप यांनी वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्याशी चर्चा केली.

अशा परिस्थितीत प्रकल्प अधिकाऱ्यांनी जाणून-बुजून पाण्याचा विसर्ग बंद केल्याने अरुणा प्रकल्पग्रस्तांनी धरणाच्या पिचिंग चे काम बंद केलेले आहे. पोलिसानी मानवतेच्या दृष्टिकोनातून अन्याय झालेल्या अरुणा प्रकल्पग्रस्तांचे कडे पहावे परंतु बळाचा वापर करून अरुणा प्रकल्पग्रस्तांना पुन्हा एकदा हुसकावण्याचा प्रयत्न झाल्यास अरुणा प्रकल्पग्रस्त एक तर जेल भरो आंदोलन अथवा पोलीस ठाण्यासमोर अमरण उपोषण करतील असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी यावेळी दिला आहे.

आमची आंदोलने लोकशाही तसेच कायदेशीर मागाँने होतील. कुठेही शांतता भंग होणार नाही असे तानाजी कांबळे, प्रकाश सावंत, अजय नागप, यांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक अतुल जाधव आणि पोलीस उप निरीक्षक देसाई यांनी कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी प्रकल्पग्रस्तांनी घ्यावी अशा  सूचना त्यांनी प्रकल्प ग्रस्ताचा यावेळी दिल्या.

प्रकल्पग्रस्तांशी सहानुभुती पुर्वक चर्चा केल्याने पोलिस निरीक्षक अतुल जाधव, उप पोलिस निरीक्षक देसाई यांच्या विषयी समाधान व्यक्त केले.

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!