वैभववाडीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

अरुणा मध्यम धरणाच्या पाण्याचा विसर्ग अचानक थांबविल्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी पिचींगचे काम पाडले बंद..

▪️धरण क्षेत्रात बुडलेली घरे दिसू लागल्यामुळेच प्रशासन व ठेकेदाराकडून पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आल्याचा प्रकल्पग्रस्तांचा आरोप..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.०२: अरुणा मध्यम धरणाच्या पाण्याचा विसर्ग अचानक थांबविल्यामुळे प्रकल्प ग्रस्तांनी धरणाच्या पिचींगचे काम रोखले आहे. प्रकल्पग्रस्त आक्रमक होत कामाला विरोध केला आहे. प्रकल्पग्रस्तांची बुडीत घरे दिसू लागल्यामुळे पाण्याचा विसर्ग थांबविला असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. आखवणे येथील अरुणा मध्यम प्रकल्पाची जानेवारी २०१९ घळभरणी करण्यात आली. घाईगडबडीत झालेल्या या घळभरणीमुळे आखवणे, भोम, नागपवाडी येथील अनेक घरे बुडीत क्षेत्रात गेली होती. जुलै महीन्यात धरणात पाणी साठविल्यामुळे ही सर्व घरे पाण्यात गेली होती. त्याचा योग्य मोबदला देखील मिळाला नव्हता. या घरांचा व स्थावर मालमत्तेचा पंचनामा व्हावा व योग्य मोबदला मिळवण्यासाठी प्रकल्पग्रस्तांचा गेल्या दोन वर्षापासून लढा सुरू आहे. जानेवारी महीन्यापासुन धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. हा पाण्याचा विसर्ग असाच सुरू ठेवावा. ज्यामुळे बुडीत क्षेत्रात गेलेल्या त्या घरांचा पंचनामा करता येईल. अशा मागणीचे निवेदन काही दिवसांपूर्वी प्रकल्पग्रस्तांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते.

पाण्याचा विसर्ग होऊ लागल्यामुळे पाण्यातील घरे दिसू लागली होती. आता या घरांचा पंचनामा होईल या अपेक्षेने प्रकल्पग्रस्तांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र २ फेब्रुवारीपासून पाण्याचा विसर्ग अचानक थांबविण्यात आला. यामुळे प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज धरणाच्या पिचींगचे काम थांबविले आहे. धरण क्षेत्रात बुडलेली घरे दिसू लागल्यामुळेच प्रशासन व ठेकेदाराकडून पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आला आहे. असा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.

जोपर्यंत पाण्याचा विसर्ग सुरू केला जात नाही तोपर्यंत काम करण्यास देणार नसल्याचा पवित्रा प्रकल्पग्रस्तांनी घेतला आहे. संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे, मुंबई अध्यक्ष प्रकाश सावंत, सेक्रेटरी अजय नागप, उपाध्यक्ष पांडुरंग जाधव, राजा कांबळे, मुकेश कदम आदी प्रकल्पग्रस्तांनी हे काम बंद पाडले.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!