कणकवली येथे तीन दिवसाचे मुर्ती प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन; सतीश सावंत

▪️भगीरथ प्रतिष्ठान व सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा पुढाकार..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴कणकवली,दि.०२: इको फ्रेंडली गणेश मूर्तींना चालना मिळावी वर्षभर चालणारी इको फ्रेंडली इण्डस्ट्री या जिल्ह्यात निर्माण व्हावी या दृष्टीने गणेश मूर्तिकार संघ, भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान व सिंधूदुर्ग जिल्हा बँक यांच्या विद्यमाने १८ ते २० फेब्रुवारी या काळात कणकवली येथील भगवती मंगल कार्यालयात तीन दिवसीय मूर्ती प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी गणेश मूर्तिकार संघाचे अध्यक्ष बापू उर्फ नारायण सावन्त भगीरथ प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, विलास मळगावकर, उदय राऊत, अजय परब, दत्तात्रय मठकर व दत्तात्रय सावंत, बंडू ठाकूर आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील पर्यावरणाचे नुकसान होऊ नये, या जिह्यात भक्तिभावाने साजरा होणाऱ्या गणेशोत्सवात वापरण्यात येणाऱ्या गणेशमूर्ती सहजरीत्या पाण्यात विरघळणाऱ्या असाव्यात या दृष्टीने जिल्ह्यात इको फ्रेण्डली गणेश मुर्त्यांची चळवळ निर्माण व्हावी,या उद्देशाने २०१९ सध्ये कुडाळ येथे प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पहिल्याच वर्षी चांगला प्रतिसाद लाभला होता. सन २०२० मध्ये कोरोनामुळे हा कार्यक्रम होऊ शकला नव्हता. सन २०२१ यावर्षी हे प्रदर्शन आयोजित करून जिल्ह्यातील मूर्तीकारांना प्रोत्साहन देण्याचा तसेच या जिल्ह्यांत गणेशभक्तांमध्ये पर्यावरणपूरक इको फ्रेंडली व सहजरित्या पाण्यात विरघरळणारी गणेशमूर्ती वापरण्याबाबत संपूर्ण जिल्ह्यात मानसिकता निर्माण व्हावी यादृष्टीने पण या प्रदर्शनामागील उद्देश ठेवण्यात आला आहे. असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार १८ फेब्रुवारी रोजी. दु. ३ वा., परीक्षण दि. २० फेब्रु, दु. १ ३० ते ३.३० तर बक्षिस वितरण त्याचदिवशी ४. वा. होणार आहे. यासाठी नाव नोंदणीची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी आहे.स्पर्धेच्या अटी व नियम असून मूर्ती सहज पाण्यात विरघळणारी असावी, स्पर्धेसाठी प्रवेश फी नसून प्रदर्शन स्थळापर्यंत मूर्ती आणण्याची जबाबदारी मूर्तिकारांची राहील. मुर्तीकार संघटनचे सदस्यत्व स्वीकारण बंधनकारक राहील. १८ ते ३५ ईंचापर्यन्त मूर्तीचे बंधन स्पर्धेसाठी आहे. ३६ इंचाची मूर्ती स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. मात्र, प्रदर्शनात तिचा सहभाग असेल. ज्वेलरीमूर्ती स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही व १८ फेब्रुवारी दुपारी १२ वाजेपर्यन्त प्रदर्शनस्थळी विराजमान करावी लागेल व ही मूर्ती पूजनीय असावी असे नियम असून स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्याच्या मूर्तीस ११ हजार, द्वितीय क्रमांकास ७ हजार व तिसऱ्या क्रमाकास ५ हजार, त्याशिवाय उत्तेजनार्थ विशेष कौशल्यासाठी पारितोषिके व स्मृतिचिन्ह प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहे.नाव नोंदणीसाठी बापू सावंत  ९४२२०७८५३९ व समीर गुरव ९४२००५१२६३ या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

*_💥सावंतवाडी शहरात तुकाराम परब यांचे दर्जेदार चिकन सेंटर.._💥*

           *🔥ग्रंथा चिकन सेंटर🔥*

_🌈आमच्या येथे बॉयलर व गावठी कोंबडी विकत मिळतील.._

*🤷🏻‍♂️आमचा पत्ता ⬇️*
प्रोप्रायटर – तुकाराम परब
पाटणकर-चौगुले तिठा, बिरोडकर टेंब, बाबा बिरोडकर मार्ग, न्यू सबनीस वाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*💁🏻‍♂️मोबाईल नंबर ⬇️*
*_📱९४२०२६१५८४_*
*_📱९४०३७०१५८५_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!