🛑 ‘हास्य कल्लोळ’मध्ये कलांकुर संघाने मारली बाजी
🛑 गोरक्षनाथ कलमठ संघ द्वितीय तर अस्सल मालवणी क्रिएशन संघाने तृतीय क्रमांक पटकाविला
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कणकवली, दि-२७:- शिमगोत्सवानिमित्त कै. सुरेश अनंत धडाम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ महापुरुष मित्रमंडळाने झेंडा चौकातील मांडावर आयोजित केलेल्या ‘हास्य कल्लोळ’ स्पर्धेत कलांकुर मालवण संघाने प्रथम क्रमांक मिळवला. गोरक्षनाथ संघ, कलमठने द्वितीय तर अस्सल मालवणी क्रिएशन, कणकवली संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. उत्तेजनार्थ पारितोषिक सिंधुरत्न कणकवली व गावडेवाडी ग्रुप कलमठ या संघांनी प्राप्त केले. या स्पर्धेत जिल्ह्यातील १० संघ सहभागी झाले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन महापुरुष मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अंधारी यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ नागरिक दिलीप पारकर, दादा नार्वेकर, राजन पारकर, निवृत्ती धडाम, विजय पारकर, बाळा सापळे, अनिल मुंज, राजेश सापळे, विलास कोरगावकर, मंदार सापळे, निलेश धडाम, राजू मानकर ,काशिनाथ कसालकर, बंड्या पारकर, पांडू वर्दम, हर्षल अंधारी,चेतन अंधारी प्रद्युम मुंज, रुद्र सापळे, सोहम वाळके, सूरज ओरसकर, प्रज्वल वर्दम, पांडू वर्दम डिचोलकर, दत्ता तोरसकर, ऋषभ मेनकुदळे, प्रसन्ना देसाई, योगेश मुंज,नाना सापळे,विकास काणेकर, संदीप अंधारी,रोशन मांगले,आदी उपस्थित होते.
कलांकुर मालवण यांनी मित्रांचे अपंगत्व व यामध्ये एका आपल्यातीलच एका सुंदर दिसणाऱ्या मैत्रिणीवर जडलेले प्रेम यावर आधारित स्क्रिप्ट सादर केली. गोरक्षनाथ कलमठ यांनी सक्को मित्र पक्का वैरी ही स्क्रिप्ट सादर केली. मालवणी क्रिएशन कणकवली यांनी राजकारणातील जनता दरबार ही स्क्रिप्ट सादर केली. सिंधुरत्न मालवण यांनी पुष्पा चित्रपटावरील आधारित डायलॉग करत रसिकांना पोटधरून हसवले. कलमठ गावडेवाडी ग्रुपने दिसता बाबा की जय आणि धनगर समाजप्रबोधन, शिमगोत्सवातील छबय यावर विनोद करत रंगत आणली. याबरोबरच जिल्ह्यातील अन्य संघांनी विविध विषयांवर मालवणी भाषेत स्क्रिप्ट सादर करीत रसिकांचे मनोरंजन केले. स्पर्धेचे परीक्षण अभिनेते श्याम नाडकर्णी, रुपेश नेवगी, प्रा. हरिभाऊ भिसे यांनी केले. स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या रसिक प्रेक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी केले.
बॉक्स
आज रात्री रंगणार राधाकृष्ण रोंबाट स्पर्धा
कणकवली बाजारपेठच्या मांडावर शुक्रवार २८ रोजी रात्रौ ९ वा. मांडावरील राधाकृष्ण रोंबाट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये कुडाळ,नेरूळ यांच्यासह जिल्ह्यातील विविध संघांनी सहभाग घेतला असून आपण रसिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन महापुरुष मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

