कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🛑अपघातात जखमी झालेल्या ग्रामसेवकाचे उपचारादरम्यान निधन..

*🛑अपघातात जखमी झालेल्या ग्रामसेवकाचे उपचारादरम्यान निधन*..

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वेंगुर्ले, दि- २८:-* मुंबई – गोवा महामार्गाच्या झाराप ते पत्रादेवी

बायपासवर मळगाव कुंभार्ली येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले उभादांडा सुखटणकरवाडी येथील रहिवासी आणि तिरोडा ग्रामपंचायत चे ग्रामसेवक ज्ञानेश अंकुश करंगुटकर (वय ५४) यांचे आज शुक्रवारी पहाटे गोवा बांबुळी येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ग्रामसेवक ज्ञानेश करंगुटकर हे आपल्या ताब्यातील दुचाकीने ओरोस सिंधुदुर्ग येथून आपले शासकीय कामकाज आटोपून मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासने मळगावच्या दिशेने वळत होते. त्याचवेळी समोर येणाऱ्या दुचाकीची समोरासमोर धडक बसून हा अपघात झाला होता. अपघातात दोन्ही मोटरसायकल वरील चौघे जण गंभीर जखमी झाले होते. त्यांना गोवा बांबुळी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश करंगुटकर यांचे उपचारा दरम्यान निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, भावजय असा परिवार आहे. ज्ञानेश करंगुटकर यांचा शांत स्वभाव, सर्वांना समजून घेण्याची वृत्ती, नाट्य क्षेत्राची आवड असल्याने सामाजिक नाटकांमध्ये सहभाग, मनमिळावू आणि हसत चेहरा असायचा. त्यांच्या निधनाने उभादांडा गावासह तिरोडा गावातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!