आणखीकुडाळकोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

🛑 कसाल हायस्कूल च्या 12 वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचा MITM इंजिनिअरिंग कॉलेजला शैक्षणिक दौऱा

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्ग, दि-२७:- इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालय कसालच्या 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी एम. आय. टी. एम. इंजिनिअरिंग कॉलेज, सुकळवाड येथे शैक्षणिक भेट दिली. या दौऱ्यात विद्यार्थ्यांना विविध अभियांत्रिकी शाखांबद्दल सखोल माहिती मिळाली, तसेच प्रत्यक्ष प्रयोगशाळा आणि वर्कशॉपमध्ये अभियांत्रिकी शिक्षणाची अनुभूती घेण्याची संधी मिळाली.

MITM कॉलेजमध्ये प्रवेश करताच, छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य आणि प्रेरणादायी मूर्ती विद्यार्थ्यांचे स्वागत करते. शिवरायांच्या तेजस्वी दर्शनाने विद्यार्थ्यांच्या मनात ऊर्जा आणि अभिमान संचारतो. विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम या मूर्तीचे दर्शन घेतले आणि महाराजांच्या विचारांना वंदन करत, आपल्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात सकारात्मकतेने केली.त्यानंतर महाविद्यालयातील शिक्षकांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, सिव्हिल आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग या विविध शाखांची माहिती दिली. त्यासोबतच प्रयोगशाळांमधील यंत्रसामग्री, तांत्रिक उपकरणे आणि कार्यप्रणाली यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

याशिवाय, महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती योजना आणि एमएचटी-सीईटी परीक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वतीने नाश्ता देण्यात आला.या दौऱ्यात महाविद्यालयाच्या विश्वस्त, प्राचार्य, शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी क्षेत्राची थेट माहिती मिळाल्याने त्यांना भविष्यातील शिक्षणासाठी योग्य दिशा निवडण्यास मदत होणार आहे.

विद्यार्थ्यांनी या दौऱ्याबाबत समाधान व्यक्त केले असून, अशा प्रकारच्या शैक्षणिक भेटी भविष्यातही घडाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

 

 

*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*

 

 

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

 

*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*

 

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

 

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

 

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*

🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत

🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक

💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या

❄️ वातानुकूलित वर्गखोल्या

🚌 बस आणि वसतिगृहाची सोय

💻 संगणकीय प्रयोगशाळा

📙 ग्रंथालयाची सुविधा

🧪 सुसज्ज प्रयोगशाळा

⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद

🗒️ यशस्वी निकालाची परंपरा

▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग

⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन

🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा

🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश

👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

 

 

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

 

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

 

☎️ संपर्क :

9158788345

8788101853

9405238763

 

*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*

ADVT || सिंधुदुर्ग ॲकॅडमी

________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!