हनुमंतगड संवर्धनात जमिनीत गाडलेल्या दरवाजाला मोकळा श्वास आणि गडावर नव्याने सापडलेल्या ५ व्या तोफेसह दोन तोफांना तोफगाड्यावर बसविण्यात येणार..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.३०: कोकणचा प्राचीन इतिहास हा इ.स.पूर्व पहिल्या दुसऱ्या काळापासून मोर्या यांची सत्ता होती नंतर सातवाहन,चालुक्य, राष्ट्रकृट, मोर्या शिलाहार अश्या राजवटी होऊन गेल्या. त्या काळात घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती. असा प्राचीन इतिहास हा कोकणाला लाभलेला आहे. त्यानंतरच्या काळात (मध्ययुगीन) आदिलशहा निजामशहा, मुघल, पोर्तुगीज डच मराठे असा अंमल हा कोकणावर राहिलेला आहे. खुद्द छत्रपती शिवाजी महाराज कोकणातील स्वारी करून कोकणातील काही जुन्या किल्ल्यांची डागडुजी केली तर काही नवीन किल्ले बांधले त्यातील समुद्रातील राजधानी म्हणजे सिंधुदूर्ग किल्ला होय. महराजांच्या दूरदृष्टी हि किल्ल्यांचा बांधकामावरून अभ्यासात येते. कोल्हापूर मार्गे दोडामार्ग मार्गे येथे जाणाऱ्या प्रमुख घाटमार्गवर हनुमंत गडाची निर्मिती करण्यात आली असून किल्ल्यावर खडकात खोदलेले पाण्याच्या टाक्या आहेत पूर्वी हा गड घाटमाथ्यावर लक्ष ठेवण्यासाठी टेहाळणी साठी वापरात असावा. बांदा किल्ला हा जवळच असेलला किल्ला असून या किल्ल्याच्या अनेक घडामोडी या इतिहासाला ज्ञात आहेत. हनुमंत गडावरील फोंड दुसरा सावंत यांच्या काळात इ.१७०९ मध्ये किल्याची बांधकाम आणि डागडुजी झाल्याची नोंद आहे. सावंतांच्या काळात किल्यावर बऱ्याच घडामोडी घडल्या त्यानंतर इ.स. १८०८ निपानीकर निंबाळकर यांच्या ताब्यात किल्ला होता. शेवटी अनेक घटनांचा साक्षीदार असलेला हनुमंत गड हा दि.१९ डिसेंबर १९३८ रोजी इंग्रजांच्या ताब्यात गेला.
सह्याद्रीचे गडावरील कार्य
हा किल्ला सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ता.दोडामार्ग फुकेरी गाव येथे हनुमंतगड आहे. सावंतवाडी तालुक्याच्या ठिकाणापासून ३१ किमी अंतरावर फुकेरी गावातून गडावर जाता येते. गडावरील तोफांना विषयी माहिती घेतली असता स्थानिक ग्रामस्थांच्या मते गडावर पूर्वी ५ तोफा होत्या त्या तोफा या घळीत ढकलून देण्यात आल्या होत्या. गावात प्रवेशकरत्या वेळी आपल्याला सुरवातीलाच दोन तोफा दिसतात त्यातील एक तोफ हि जमिनीत गाडलेली तोफ ३० जुलै २०१८ रोजी गेले असता बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्यानंतर तोफेचे महत्व पटवून देत तोफ बाहेर काढून संवर्धन करण्या संदर्भात ग्रामपंचायतीत पत्र देण्यात आले. तसेच या गावातून वर चढताना खिंड लागते या खिंडीत झाडीत सहा फुट लांबीच्या दोन तोफा पडलेल्या होत्या या तोफा गावकऱ्यानी गडाच्या पायथ्याकडे असलेल्या देवी माऊली मंदिराजवळ ठेवल्या आहेत. या तोफांना चौथऱ्यावर बसविण्याची ना हरकत सह्याद्री सिधुदूर्ग विभागाला ग्रामस्थांनी दिलेली आहे. सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदूर्ग विभागाततर्फे गडावर संवर्धनाचे काम सुरु आहे. यामध्ये देवी माऊली सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ फुकेरी ग्रामस्थ यांचे सहकार्य नेहमीच लाभले आहे. गडावर जाणाऱ्या वाटा दुरुस्ती करणे, तटबंदी,बुरुजावरील झुडपे काढणे,दिशा दर्शक, सूचना फलक आणि वास्तू दर्शक लावणे अशी कामे नियमितपणे सुरु आहेत. गडाच्या दुर्ग अवशेषांचे जतन आणि संवर्धन व्हावे यासाठी देवी माऊली सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ फुकेरी ग्रामस्थांच्या मदतीने हे कार्य सुरु आहे.
५ व्या तोफेची शोध मोहीम
दि.२६ आणि २७ डिसेंबर रोजी सलग झालेल्या मोहिमे दरम्यान गडावर येणाऱ्या मुख्य राजमार्गावर वाटांची दुरुस्ती करण्यात आली तसेच ग्रामस्थांनी सांगितल्या प्रमाणे तोफेचा शोध घेण्याचे प्रयत्न झाले. परंतु त्यावेळी गडावरील ५ वी तोफ निदर्शनास आली नाही. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ श्री आप्पा आईर यांच्या निदर्शनास तोफ आली त्यांनी संस्थेचे सदस्य श्री रामचंद्र आईर नान्हु आईर यांना कळविले त्यांनी दि.४ जानेवरी २०२१ रोजी रामचंद्र आईर, नान्हु आईर यांच्या नेतृत्वखाली स्थानिक ग्रामस्थ आणि सिंधुदुर्ग विभागाचे सदस्य विठ्ठल आईर, संदीप आईर, सदाशिव आईर, सिद्धेश आईर, अप्पा आईर, यांनी फुकेरी गावातून गडावर जाण्याऱ्या दिंडी दरवाजाच्या वाटेवर असलेल्या पाण्याच्या ओह्ळात पूर्णपणे गाडलेली तोफ बाहेर काढली.
गडावरील जमिनीत गाडलेल्या प्रवेशद्वारास मोकळा श्वास
सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदूर्ग विभागा मार्फत हनुमंतगडावरील वर्षानुवर्ष जमिनीत गाडलेल्या गडाचा प्रवेशद्वार हा संस्थेच्या सदस्यांनी मातीतून मोकळा करण्याचे ठरविले आणि दि.२६,२७ डिसेंबर २०२० आणि १६,१७ जानेवारी २०२१ या दिवशी गडावर मुक्कामी मोहिमांचे आयोजन करून अथक प्रयत्नाने या प्रवेशद्वाराला मोकळा केला दरवाजाची कमान पडलेली असून देवड्या या सुस्थित आहेत. या मोहिमेत संस्थेचे सदस्य सुनील राऊळ, प्रकाश सावंत, रोहन सावंत, विवेक गावडे यांच्या सह संस्थेचे पदाधिकारी आणि श्री देवी माऊली सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ फुकेरी ग्रामस्थं यांचे हि सहकार्य लाभले. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील किल्ले हनुमंत गड हा आता संवर्धनातून पर्यटनाच्या दृष्टीने पुढे येत आहे. सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदूर्ग विभाग आणि श्री देवी माऊली सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ फुकेरी ग्रामस्थं यांच्या सहकार्याने गडावर सतत भविष्यात संवर्धन मोहिमा राबवण्यात येणार असून गडावर नव्याने निदर्शनास आलेली तोफ आणि गावातील तोफ या दोन तोफांना स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने गडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारका जवळ तोफगाड्यांवर विराजमान करण्यात येणार आहेत. सह्याद्रीच्या कार्यात आपण हि सहभागी व्हावे असे सिंधुदूर्ग विभागाकडून जिल्ह्यातील समस्त शिवप्रेमींना आव्हान करण्यात आले.
सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग
🕉️ *||श्री||*
*||आरोग्यम् धनसंपदा||*
🛐 *आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगांव येथे प्रथमच नव्याने सुरू झाले आहे.
🏥 *जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगांव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी…..!
*अँक्यू नेचर क्युअर पर्वरी-गोवा संचलित….!*
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा केंद्र*‼️
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला.
✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!*
♨ *आहार हेच तुमचे औषध*
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटांचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या
*💥सांध्याचे आजार :-*
मान, पाठ, कंबर, गुडघा, टाच दुखी, शोल्डर पेन, सायटिका, स्पॉन्डिलाइटिस, वाताचे आजार, संधिवात/ आमवात
*💥 शारीरिक /मानसिक विकार :-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी, मायग्रेन (अर्धशिशी) झोप न येणे.
*💥पोटाचे विकार :-*
अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, पोटदुखी, मुळव्याध, कावीळ.
*💥लहान मुलांचे आजार :-*
दमा, ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे, स्मरणशक्ती वाढविणे.
*💥स्त्रियांचे विकार /आजार :-*
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार, हार्मोन इन बॅलन्स, रक्त कमी होणे, शारीरिक /मानसिक अनेक समस्या.
✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध उपचार सुविधा:~*
☑योग🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉
*💫आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार🧘♂️🧎🏽
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️ 24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣
*उपचाराची वेळ-*
*सकाळी-*🌅 ८.०० ते *दुपारी-* २.००, *सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००
*टीप-* उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.
☎️ *संपर्क* – *९४०३८२७२६१,८३२९३३१७२०*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_