🛑शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत रुपेश परब अव्वल
*🛑शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत रुपेश परब अव्वल*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १२:-* राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या दर्जेदार आणि गुणवत्ता पूर्ण शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुली नंबर चार या प्रशालेतील पदवीधर शिक्षक रुपेश परब याने आपल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून तालुका आणि जिल्हास्तरावर आपली मोहर उमटून शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करून जिल्हयात अव्वल ठरण्याचा मान मिळविला आहे. यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांच्या वतीने प्राचार्य राजेंद्र कांबळे, जेष्ठ अधिव्याख्याता जाधव, पवार .इत्यादी अधिकारी वर्ग यांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक सन्मानपत्र आणि गौरवचिन्ह देऊन अभिनंदन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित शैक्षणिक पद्धतीचा अवलंब केला जातो ज्ञानातील प्रगतीमुळे विद्यार्थ्यांना अधिकाधिक शिकण्याचा अनुभव मिळावा आणि अध्यापन सोपे व्हावे यासाठी शिक्षण देण्याचाही समावेश झाला आहे यासाठी शिक्षक ऑनलाईन उपलब्ध असलेल्या प्रचंड संसाधनांचा वापर करून सतत शिकत आहे आणि शिक्षण देत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून संकल्पना बद्दल सखोल ज्ञान मिळण्यास मदत होते.
अध्यापन प्रक्रियेत क्रांती घडवून आणण्यासाठी वर्ग खोल्यांमध्ये तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे यासाठी सातत्याने आपल्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांचे शिकणे सोपे केले आहे यातून ॲनिमेटेड शैक्षणिक व्हिडिओ विद्यार्थ्यांना प्रेरणा देते आणि प्रभावी होण्यास मदत होते. यातूनच शिक्षण प्रक्रियेची गुणवत्ता वाढण्यास मदत होते आधुनिक युगात व्यवहारिक शिक्षणाचे महत्त्व वाढले आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात शिकण्याचा अनुभव वाढविण्यासाठी स्मार्ट बोर्ड, शैक्षणिक ॲप्स, युट्युब यासारखे सोशल मीडिया आणि इतर तंत्रज्ञान आधारित प्लॅटफॉर्म वापरतात यातून विद्यार्थ्यांची उपस्थिती सहभाग आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते यातूनच शिकण्याचे परिणाम सुधारतात या सर्व बाबींमध्ये तंत्रस्नेही शिक्षक रुपेश परब यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.
गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत घटकनिहाय आणि विषयनिहाय व्हिडिओ निर्मितीत तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय स्पर्धेत तब्बल अठरा सन्मानपत्र मिळवून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकावर स्थान निश्चित करून आपल्या शाळेचे नाव उज्वल केले या यशाबद्दल रुपेश परब यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

