🛑घरात घुसून सोन्याचा हार लंपास -पोलिसांनी केले आरोपिला जेरबंद
*🛑घरात घुसून सोन्याचा हार लंपास -पोलिसांनी केले आरोपिला जेरबंद*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १२:-* खासकीलवाडा येथील धनश्री विजय चव्हाण यांच्या घरात घुसून सोन्याच्या हाराची चोरी केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी न्हावेली येथील एकाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई काल रात्री करण्यात आली. महादेव उर्फ अक्षय सुरेश मेस्त्री असे त्याचे नाव आहे. आपण हा प्रकार केल्याची कबुली त्याने दिली आहे.आज त्याला येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, खासकीलवाडा येथे राहणाऱ्या सौ. चव्हाण यांच्या घरात ७ तारखेला अज्ञात चोरट्याने चोरी केली होती. यात सोन्याचा हार लंपास केला होता. या प्रकरणी चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी चोरट्याचा शोध घेण्यासाठी गोपनीय माहिती देणाऱ्यांचा आधार घेतला. यात मेस्त्री याने हा हार चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी काल रात्री त्याला हारासह ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे चौकशी केली असता आपण ही चोरी केल्याची कबुली त्याने दिली. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

