प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कोकण प्रांतातील युवा धर्मप्रेमींसाठी ऑनलाईन ‘शौर्य गाथा’ व्याख्यान संपन्न..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.२७: युवकांना क्रांतिकारकांच्या त्यागाची जाणीव करून देणे, युवकांमधील शौर्य जागृत करणे, हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी जागृती करणे या उद्देशाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मंगळवार, २६ जानेवारी २०२१ या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोकण प्रांतातील युवा धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन शौर्य गाथा व्याख्यान’ आयोजित करण्यात आले होते.
युवा धर्मप्रेमींना राष्ट्र व धर्मकार्यासाठी कृतिप्रवण करणे हा यामागचा उद्देश होता. या ‘ऑनलाईन व्याख्याना’स १४५ धर्मप्रेमी सहभागी झाले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अदिती तवटे, कु. पुजा धुरी यांनी केले.
तेजाच्या साधनेमध्ये मग्न असणारा तो भारत असे दैदिप्यमान नाव असताना इंडिया हे इंग्रजांनी दिलेले नाव आपण घेत आहोत. अधःपतन आणि गुलामगिरीचे द्योतक म्हणजे इंडिया हे नाव आहे. ७० वर्ष झाली तरी अजूनही आपण मानसिक गुलामगिरीत राहत आहोत. भारताला पुनर्वैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर प्रत्येकाने आपल्या देशाला भारत किंवा हिंदुस्थान संबोधावे लागेल.
भारताला हे पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी हिंदू प्रजासत्ताक राष्ट्र अर्थात हिंदुराष्ट्र स्थापन करण्याचा संकल्प आजच्या दिवशी करा, असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनी केले.
श्री. सुमित सागवेकर पुढे म्हणाले, अनेक मनुष्य जन्माचे पुण्य असल्यावर भारतात आणि विशेष म्हणजे हिंदू म्हणून जन्म मिळतो आणि आपल्याला ते सौभाग्य लाभले आहे. या सौभाग्याचा उपयोग आपल्याला भारताला पुन्हा एकदा विश्वगुरू करण्यासाठी करायचा आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच पातशाह्या महाराष्ट्रात थैमान घालत असताना हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ते अजून १० वर्षे जगले असते तर इंग्रज संपूर्ण भारत पाहू शकले नसते असा उल्लेख इंग्रज गव्हर्नर करतात, इंग्लंडच्या दैनिकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज्यांचा उल्लेख किंग ऑफ इंडिया असा केला जातो. ज्यांनी स्त्रीच्या अंगाला हात लावणाऱ्या नराधमाचा चौरंगा करून आपल्याला शौर्याचा आदर्श घालून दिला, त्याचप्रमाणे ज्यांनी स्वताचा विचार न करता देशासाठी बलिदान दिले असे क्रांतिकारक भगतसिंह, सुखदेव, राजगुरू,स्वातंत्रविर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांचे स्मरण आपण सतत केले पाहिजे.
हिंदुराष्ट्राची आवश्यकता स्पष्ट करताना श्री. सुमित सागवेकर म्हणाले , आज आपल्या देशात ‘भारत तेरे तुकडे होंगे, अफजल हम शरमिंदा है, तेरे कातिल जिंदा है’ अशा देशविरोधी घोषणा दिल्या जातात, तेव्हा देशासाठी बलिदान दिलेल्या क्रांतीविरांना किती दुःख होत असेल. ही स्थिती पालटण्यासाठी आज आपल्या सर्वांना हिंदू प्रजासत्ताक राष्ट्र म्हणजेच बलसगर भारत निर्माण करायचा आहे. त्यासाठी प्रयत्नांची शर्थ करायची आहे. भारतभूमीला हिंदुराष्ट्र करणे हाच खरा पुरुषार्थ आहे आणि त्याविना जीवन व्यर्थ आहे. त्यासाठी आपण जाती, पंथ, संघटना यांच्या बेड्या तोडून सर्व हिंदूंनी एकसंघतेचा अविष्कार घडवूया आणि हिंदुराष्ट्राचा मुकुट आपल्या भारत मातेच्या शीरावर चढविण्यासाठी सिद्ध होऊया असे आवाहन त्यांनी धर्मप्रेमींना केले.
*_💥पोल्ट्री साहित्याच्या शोधात आहात? चिंता सोडा..💥_*
🌈आमच्या दर्जेदार, टिकाऊ व माफक दरातील पोल्ट्री साहित्याचा अनुभव घ्या! आणि सोडा सुटकेचा निश्वास..😊
_*🐓🔥 सिश्रायु पोल्ट्री सर्व्हिस 🔥🐓*_
_*💫आमच्याकडे पोल्ट्री साठी लागणारी जाळी, खाद्य भांडी, पाणी भांडी, ताडपत्री, भुसा ढवळण्याची मशीन इत्यादी साहित्य माफक दरात मिळेल..*_
*🤷🏻♂️ संपर्क ⬇️*
श्री. अमित देसाई,
निळेली (माणगाव)
तालुका. कुडाळ, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*🤷🏻♀️ मोबाईल नंबर ⬇️*
_*📱9403559599*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_