सिंधुदुर्गात कुडाळ-सावंतवाडी येथील युवा धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाइन शौर्य जागृती व्याख्यान’ संपन्न..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴सिंधुदुर्ग,दि.१२: हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी जागृती करणे, युवकांमधील शौर्य जागृत करणे, आपत्काळाच्या दृष्टीने साधनेचे महत्त्व आणि जीवनातील स्वरक्षण प्रशिक्षण शिकण्याचे महत्त्व बिंबवण्यासाठी कुडाळ-सावंतवाडी येथील युवा धर्मप्रेमींसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन शौर्य जागृती व्याख्यान’ आयोजित करण्यात आले होते. युवा पिढीला राष्ट्र व धर्मकार्यासाठी कृतिप्रवण करणे हा या व्याख्यानाचा उद्देश होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. निना कोळसुलकर यांनी केले.
हिंदू राष्ट्र स्थापनेची आत्मज्योत प्रत्येकाच्या हृदयात जागृत करूया! श्री. निरंजन चोडणकर, हिंदू जनजागृती समिती धर्म हा राष्ट्राचा पाया आहे. धर्म हाच सर्वश्रेष्ठ आहे. धर्मावर आपली दृढ श्रद्धा असायला पाहिजे. देवी-देवतांचे होणारे विडंबन, देव, देश आणि धर्म यांची होणारी धर्महानी रोखण्यासाठी आपण सर्वांनी संघटितपणे प्रयत्न करायला पाहिजे. धर्मावर आलेली ग्लानी दूर करण्यासाठी आपण स्वतः धर्माचरण करून सर्वांनी समाजाला जागृत करायला पाहिजे. आपल्यातील आत्मबळ वाढविण्यासाठी प्रतिदिन १ तास कुलदेवतेचा नामजप करायला पाहिजे. हिंदू राष्ट्र स्थापनेची आत्मज्योत प्रत्येकाच्या हृदयामध्ये जागृत होण्यासाठी प्रत्येक हिंदू पर्यंत धर्माचरणाचे महत्त्व पटवून द्यायचे आहे. सध्या देशामध्ये अंतर्गत युद्ध व बाह्य युद्ध सुरू आहेत. बाह्य युद्ध लढण्यासाठी सीमेवर भारतीय सैनिक सिद्ध आहेत. अंतर्गत युद्ध लढण्यासाठी आपण सक्षम व्हायला हवे, असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे श्री. निरंजन चोडणकर यांनी बोलताना केले.
राष्ट्रपुरुषांचे आणि क्रांतिकारकांचे नुसते बलिदान दिन साजरे करण्यापेक्षा त्या राष्ट्रपुरुषांचा आदर्श समोर ठेवूया. धर्माच्या रक्षणासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या धर्मवीर संभाजी महाराजांचा आदर्श आपल्यासमोर आहे. स्वतःमध्ये शौर्य जागरण करणे, साधनेचा संस्कार करणे, भक्ती आणि शक्ती निर्माण करणे हे या स्वरक्षण प्रशिक्षणाच्या माध्यमातून साध्य होऊ शकते. येणाऱ्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सर्व युवकांनी स्वतःचे कर्तव्य, दायित्व आणि योगदान ओळखून प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण शिकून स्वयंसिद्ध होऊया असे आवाहन श्री. निरंजन चोडणकर यांनी केले.
*💥………………. प्रवेश सुरु ………………. 💥*
_🌈तंत्र शिक्षण क्षेत्रात करियर करण्याची संधी.._
*🔥डिप्लोमा इन इलेक्ट्रिशीयन🔥*
_💫कालावधी – १ वर्ष_
_💫शैक्षणिक पात्रता – किमान १० उत्तीर्ण_
*🤷🏻♂️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*इन्स्पायर एज्यूकेशन, सावंतवाडी (7466A)*
*_📱संपर्क : 9422896699_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_