‘ईशनिंदाविरोधी कायद्याची मागणी का?’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीचे ‘ऑनलाईन’ चर्चासत्र..

▪️हिंदु देवतांची खिल्ली उडवणार्‍यांना शिक्षा झालीच पाहिजे; अभिनेत्री पायल रोहतगी

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴सिंधुदुर्ग,दि.25: चित्रपट, वेबसिरीज यांच्या माध्यमातून हिंदुद्वेष पसरवण्याचे जाणीवपूर्वक षड्यंत्र रचले गेले आहे, जेणेकरून सनातन हिंदु धर्माच्या अनुयायांमध्ये न्यूनगंड आणि हिंदु धर्माविषयी नकारात्मकता निर्माण होईल अन् ते त्यांची ‘हिंदु’ म्हणून ओळख विसरतील. चित्रपट किंवा वेबसिरीज यांना प्रकाशझोतात आणण्यासाठीही असे प्रकार केले जातात. ज्यांना नीट अभिनयही करता येत नाही, अशांना केवळ त्यांच्या देशविरोधी आणि हिंदुविरोधी भूमिकेमुळे चित्रपटांत किंवा वेबसिरीजमध्ये काम मिळते. ही एक रणनीती आणि हिंदु धर्मावर छुप्या मार्गाने केला जाणार आघात आहे. केंद्रसरकारने बहुसंख्यांकांच्या धर्मभावनांची दखल घेऊन सामाजिक सलोख्यासाठी ईशनिंदाविरोधी कायद्यासारख्या कठोर कायदा करावा, तसेच स्वतःच्या ‘करिअर’साठी किंवा ‘फॅशन’साठी हिंदु देवतांची खिल्ली उडवणार्‍यांना शिक्षा झालीच पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन अभिनेत्री पायल रोहतगी यांनी केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘चर्चा हिन्दु राष्ट्र की’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत ‘ईशनिंदाविरोधी कायद्याची मागणी का ?’ या विषयावर ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. यू-ट्यूब, फेसबूक आणि ट्वीटर या माध्यमांतून प्रसारित झालेला हा कार्यक्रम 57 हजारांहून अधिक जणांनी पाहिला.

यावेळी हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले, ‘‘चित्रपट, वेबसिरीज यांच्या माध्यमांतून हिंदुद्वेष पसरवणे, हा एक प्रकारचा बौद्धिक आतंकवाद आहे आणि हिंदु त्याला बळी पडत आहेत. अन्य धर्मियांनी आक्षेप घेतल्यावर ‘सॅटनिक व्हर्सेस’ ही कादंबरी आणि ‘द दा विंची कोड’ यांसारख्या चित्रपटांवर लगेच प्रतिबंध घातला जातो; पण हिंदूंनी आक्षेप घेतल्यावर अशी कारवाई होत नाही. चित्रपटाला मान्यता देण्यासाठी सेन्सॉर बोर्ड आहे; पण त्याचे सदस्य कशाच्या आधारावर चित्रपटांना मान्यता देतात, हा प्रश्‍न आहे. याविषयी जागृती करण्यासाठी मोठे आंदोलन उभे करण्याची आवश्यकता आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले, तरी त्याला मर्यादाही आहे. सध्या उपलब्ध असलेल्या कायदेशीर साधनांचा योग्य वापर करून हिंदुद्वेषाला आळा घातला गेला पाहिजे.’’ या वेळी देवतांच्या विटंबनेच्या विरोधात कायदेशीर लढा देणारे हिंदु आय.टी. सेलचे संस्थापक श्री. रमेश सोलंकी यांनी ‘देवतांच्या विटंबनेच्या विरोधात तक्रार नोंदवून घ्यायलाही पोलीस टाळाटाळ करत असल्याचा अनुभव येतो. याविषयी हिंदूंनी जागृत होण्याची आवश्यकता आहे. तुम्ही सुधारा; अन्यथा आम्ही तुम्हाला कायदेशीरदृष्ट्या सुधारू’, अशी चेतावणी त्यांनी हिंदुविरोधकांना दिली.

ईश्‍वरनिंदा विरोधी कायद्याच्या मागणीसाठी २३ जानेवारीला सोशल मीडियावर ऑनलाईन आंदोलन करण्यात आले. या वेळी ट्विटरवर #IndiaWants_BlasphemyLaw हा हॅशटॅग राष्ट्रीय ट्रेंडमध्ये द्वितीय स्थानावर, तर #ईशनिंदा_कानून_चाहिए हा हॅशटॅग पाचव्या स्थानावर होता. याविषयी ‘ऑनलाईन पिटीशन’ही राबवण्यात येत आहे.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!