आरोस अपघातातील वायरमनचे निधन; महिनाभर सुरू होते उपचार

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : बांदा

🎴बांदा,दि.२७: आरोस गिरोबावाडी येथून आरोस बाजारच्या दिशेने जाणारे वायरमन दीपक आत्माराम नाईक (वय ४५) यांच्या दुचाकीसमोर अचानक बिबटा आल्याने मोठा अपघात झाला होता. अपघात भीषण असल्याने गेले २५ दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना आज बुधवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.

आरोस मधील दीपक नाईक यांना झालेल्या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर गोवा बांबोळी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारात ते चांगला प्रतिसाद देत असल्याने त्यांना सावंतवाडी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु आज दुपारी उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली अन आरोस गावावर शोककळा पसरली.

दांडेली-आरोसमार्गे कोंडुरा रस्त्यावर गवे रेडे व बिबट्याचा वावर कायम असतो. त्या रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वायरमन दीपक नाईक आपल्या घरी गिरोबावाडी येथून आरोस बाजार येथे जात असताना अपघात झाला अन आज श्री. नाईक यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले. रात्रंदिवस ग्राहकांना सुरळीत सेवा देण्यासाठी त्यांची सदोदित तळमळ होती. आरोस गावासह मडुरा, पाडलोस, रोणापाल, न्हावेली गावातील वीज ग्राहकांना रात्रंदिवस उत्तम सेवा देण्यासाठी त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्या जाण्याने आरोस पंचक्रोशीतील नागरिकांवर शोककळा पसरली आहे.

दीपक नाईक यांच्या पतश्यात पत्नी, तीन मुली, भाऊ, भावजय असा मोठा परिवार आहे.

_*🔥वर्षभराची जाहिरात केवळ १५ ते २० रुपयात..💥*_

💫डेट कॅलेंडर १५ रुपये (६ पानी आर्ट पेपर) (फर्मच्या नावे छपाई २०० पासून) साईज 10″×15″
💫पॉकेट डायरी २० रुपये (रेक्झीन कवर, छपाईसहित)
💫 विविध प्रकारच्या डेट डायऱ्या..
💫टेबल कॅलेंडर्स ५५ रुपये पासुन..
💫पॉलि कॅलेंडर्स १२ रुपये पासुन..
💫आधुनिक प्रकारचे नायलॉन, प्रिइंक शिक्के..

_*🌈खास एल.आय.सी. एजंट साठी उपयुक्त डेट कॅलेंडर व फाईल्स; शिवाय विविध प्रकारच्या भेटवस्तू 🤷🏻‍♂️*_

*💁🏻‍♂️ आमचा पत्ता ⬇️*
प्रसाद ऑफसेट, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*🙋🏻‍♂️मोबाईल नंबर ⬇️*
_*📱7057956111*_
_*📱9422065195*_
*💁🏻‍♀️ व्हाट्सअप नंबर ⬇️*
_*📲9822856111*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!