माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व जुन्या शिवसैनिकांनी पाळणेकोंड धरणावर जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतींना दिला उजाळा..
▪️बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला लावलेली माडाची झाडे निघाली भगवी; नारळही भगवे झाल्यामुळे खऱ्या अर्थाने स्मृती झाल्या चिरंतन
▪️जुन्या शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या या स्मृती स्थळावर वाहिली आदरांजली..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.२४: आपल्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत २०१३ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती सदैव चिरंतन राहाव्यात यासाठी त्यांच्या जन्मदिनादिवशी सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या संकल्पनेतून जुन्या शिवसैनिकांनी पाळणेकोंड धरणावरील गणपती मंदिर शेजारील जागेत ५ कल्पवृक्ष एकत्र लावले होते, त्यातील तीन कल्पवृक्ष (माडाची झाडे) मोठी झालीत. सात वर्षात त्यातील एक माडाच्या झाडाला नारळ लागायला सुरुवातही झाली. त्या माडाचे नारळ भगवे, माडाचे खोड भगवे. हा एक चमत्कारच या स्थळाला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट देऊन आदरांजली वाहिली.
सन २०१३ मध्ये पाळणेकोंड धरण श्री गणपती मंदिर शेजारील जागेत तत्कालीन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या संकल्पनेतून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती सदैव चिरंतन राहाव्यात या धरणावर गेल्यानंतर पर्यटकांना ते स्थळ पाहून बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा मिळावा म्हणून एकत्रित पाच माडाची झाडे लावण्यात आली होती.
यावेळी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, नगरसेवक विलास जाधव, सुदन आरेकर, संजय पेडणेकर, राजू बेग, देवेंद्र टेमकर, कीर्ती बोंद्रे, माई मीशाळा, साक्षी कुडतरकर, अफरोज राजगुरू, शुभांगी सुकी, शांभवी पटेकर, शर्वरी धारगळकर, यांच्या उपस्थितीत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पाच माडाची झाडे रोपे एकत्र लावली होती. त्या माडाच्या झाडांना सात वर्षे पूर्ण झालीत. त्या पाच झाडांपैकी तीन झाडे, ब्रम्हा-विष्णू-महेश चांगल्या प्रकारे वाढलीत. तर एक झाड मेले, तर एका झाडाची वाढ झाली नाही, ते सगळ्यात मागे राहिले व पुढे असलेली तीन झाडे ब्रह्मा-विष्णू-महेश बाळासाहेब ठाकरे यांची स्मृतीस्थळ म्हणून नावारूपास आली आहेत.
विशेष म्हणजे यातील एका माडाच्या झाडाला नारळही लागले आहेत, ते नारळही भगवे व माडाच्या तीनही झाडांची खोडेही भगवी झाल्यामुळे खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती या ठिकाणी चिरंतन राहतील असा विश्वास माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी या स्थळाला भेट दिल्यावर व्यक्त केला.
या स्थळाची बबन साळगावकर व सहकाऱ्यांनी साफसफाई करून त्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी बाळासाहेबांचे जुने शिवसैनिक लक्ष्मण कुडतरकर, जावेद शेख, सुरेश भोगटे, महेश नार्वेकर, गुरु वालावलकर, बावतीस फर्नांडिस आदी उपस्थित होते.
*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*
*🤷🏻♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻♀️*
*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻♂️_*
*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘
_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_
*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*
*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*
*🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._
*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_