राजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात प्रवेश घेणे म्हणजे सत्तेचा माज; बबन साळगावकर

▪️संजू परब यांच्या उखडे उखडे गॅगने सावंतवाडीत हैदोस घातला..

▪️राष्ट्रवादी च्या माध्यमातून संजू परब यांची उखडे उखडे गॅंग उखडून टाकेन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.३१: माजी आमदार राजन तेली यांनी प्रशासनातील विविध पदे भूषवली आहेत. असे असताना नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहाचा उपयोग पक्षीय कामासाठी करून त्या ठिकाणी पक्ष प्रवेश घेऊन त्यांनी सभागृहाचा अवमान केला आहे  हा सत्तेचा माज आहे. त्यांनी याबाबत सावंतवाडी वासियांची जाहीर माफी मागावी. असे आवाहन सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत केले.

राज्याचे माजी राज्यमंत्री, आमदार रवींद्र चव्हाण यांनी शहरात येऊन माझ्यावर टीका करण्यापेक्षा शहरातील कामांचा आढावा घेतला असता, जनतेची गाऱ्हाणी ऐकली असती व विद्यमान नगराध्यक्ष संजू परब यांना सूचना केल्या असत्या, तर ते अधिक हिताचे ठरले असते. मात्र, कोणतीही माहिती न घेता माझ्यावर टीका करणाऱ्या रवींद्र चव्हाण यांना येत्या काही दिवसात त्यांची उघडे उघडे गॅग हद्दपार करून टीकेची परतफेड करू असा इशारा श्री. साळगावकर यांनी दिला.

राजकारणातील अपयशानंतर आपल्या हितचिंतकांना बबन साळगावकर यांचे राजकारण संपले असे वाटले. मात्र, ज्या-ज्या वेळी असे घडले त्यावेळी बबन साळगावकर पुन्हा उभे राहिले. हा इतिहास आहे. तो कोणीही पुसून टाकू शकत नाही. म्हणून येत्या काळात राष्ट्रवादीच्या माध्यमातून सावंतवाडी शहरात आपण नवा इतिहास घडवू असा आशावाद यावेळी बोलताना श्री. साळगावकर यांनी व्यक्त केला.

माझ्या कारकिर्दीत मंजूर झालेल्या कामाची फक्त भूमिपूजन करण्याचे काम करायचे आहे. अन्य कोणतेही काम ते सावंतवाडीत करू शकत नाहीत. त्यांनी वर्षभरापूर्वी मोती तलावाच्या उखडून टाकलेला फूटपाथ अद्यापही दुरुस्त करू शकले नाहीत. यावरून त्यांची कार्यक्षमता दिसून येते. असा टोलाही यावेळी श्री. साळगावकर यांनी मारला.

टीआरसी मधील गाळा कोणतीही निविदा न करता परस्पर विकला जातो. नगरपालिकेने पैसे देऊन जागांवर टाकले आरक्षणे उठवली जातात. हा सर्व प्रकार उघडे उघडे गॅग करत आहे. सावंतवाडीत अशाप्रकारचे गलिच्छ राजकारण कधी केले गेले नाही. सावंतवाडी वासियांना त्रास होईल असे कोणताही नगराध्यक्ष वागला नाही. मात्र, संजू परब यांचा गेल्या वर्षभराचा कारभार पाहिला असता सावंतवाडी तो भूषणावह नाही. म्हणून याबाबत बोलणे भाग पडले असे श्री. साळगावकर म्हणाले.

नगराध्यक्ष व त्यांच्या उखडे उखडे गॅंगने सावंतवाडीत घातलेला हैदोस सर्वज्ञात आहे. व त्याची माहिती आपल्या जवळ आहे. जे बेकियदेशीर ठराव घेतले गेले आहेत, ते सर्व ठराव रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे याचिका दाखल केली जाईल. असे श्री. साळगावकर यांनी स्पष्ट केले आहे.

*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*

*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*

*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..

*_🙋🏼‍♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*

*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!