कोकणक्राइमसावंतवाडीसिंधुदुर्ग

शांत,सुसंस्कृत सावंतवाडीतील राडेबाजीला वेळीच आळा घाला-बबन साळगांवकर

सावंतवाडी,दि.०४:-नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष सौ.अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या घरावरती झालेल्या भ्याड हल्ल्याचा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. उपनगराध्यक्ष सारख्या पदाधिकाऱ्यांच्या घरावरती हल्ला करण्याची हिंमत कशी होती?? शहरातील सत्तांतर नंतर हे प्रकार वाढीस लागले आहेत पोलिसांनी या घटनेचा योग्य वेळीच दखल घेऊन गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा बिमोड केला पाहिजे एका शांतताप्रिय शहरांमध्ये आठ-दहा लोकांचा टोळकं येऊन घरावरती हल्ला करण्याची हिम्मत करते हे पोलिसांचं अपयश समजायचं का की नवीन आलेल्या पोलीस निरीक्षकांना गुंडांनी दिलेली सलामी समजायची या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे गेल्या वर्षभरातील अनेक प्रकार या शहरांमध्ये झालेले आहेत सदर प्रकरणाची अदखल गुन्ह्याची नोंद घेऊन या गुंडागिरी चा बिमोड करावा अशी मागणी बबन साळगांवकर यांनी केली आहे. हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन ऐश्वर्या,अखिलेश,पुष्पलता कोरगावकर प्रसाद कोरगावकर उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांची भेट घेतली यावेळी सुरेश भोगटे, अभय पंडित उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!