आमदार नितेश राणे यांनी युवा खेळाडू ओंकार व वृत्तीक यांचा आर्थिक भार उचलला..

▪️तालुकाध्यक्ष काझी, जिल्हा चिटणीस साठे यांच्या हस्ते आर्थिक मदत दोघा खेळाडूंकडे सुपूर्द..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.२४: राज्याच्या क्रिकेट संघात निवड झालेल्या ओंकार व वृत्तीक या दोन खेळाडूंचा आर्थिक भार मतदारसंघाचे पालक आमदार नितेश राणे यांनी उचलला आहे. येथील भाजपा कार्यालयात तालुकाध्यक्ष नासीर काझी, जिल्हा चिटणीस भालचंद्र साठे यांच्या हस्ते आर्थिक मदत दोघा खेळाडूंकडे सुपूर्द करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा कार्यकारणी सदस्य राजेंद्र राणे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर, राजू पवार, शक्ती प्रमुख प्रदीप नारकर, प्रकाश पाटील, दाजी पाटणकर, अनंत फोंडके आदी उपस्थित होते.

ओडिशा येथील भुवनेश्वर येथे ही राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत तालुक्यातील कोकिसरे गावचे खेळाडू ओंकार नेवरेकर व वृत्तीक बेळेकर हे दोघेजण राज्याच्या संघातून खेळणार आहेत. दोन्ही खेळाडू हे शेतकरी कुटुंबातील आहेत. ओंकार नेवरेकर हा खेळाडू येथील आनंदीबाई रावराणे  महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकत आहे. तर वृत्तीक हा डोंबिवली येथील प्रगती कॉलेजमध्ये शिकत आहे. या खेळाडूंना स्पर्धेसाठी जाण्यास कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून आ. नितेश राणे यांनी पालकत्वाची जबाबदारी स्वीकारली आहे. दोघांना प्रत्येकी दहा हजारांची मदत त्यांनी केली आहे. यावेळी नासीर काझी म्हणाले, निश्चितच निवड झालेल्या या खेळाडूंचा वैभववाडी वासियांना सार्थ अभिमान आहे. त्यांचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे. गरीब कुटुंबातील या खेळाडूंना आर्थिक टणचण भासू नये याची काळजी आम्ही घेतली आहे. या दोघांच्या पाठीशी सर्वांच्या शुभेच्छा, आशीर्वाद आहेत. त्यांनी संधीचं सोनं करून या क्षेत्रात प्रगती साधावी असे सांगितले.

*_💥सावंतवाडी शहरात तुकाराम परब यांचे दर्जेदार चिकन सेंटर.._💥*

           *🔥ग्रंथा चिकन सेंटर🔥*

_🌈आमच्या येथे बॉयलर व गावठी कोंबडी विकत मिळतील.._

*🤷🏻‍♂️आमचा पत्ता ⬇️*
प्रोप्रायटर – तुकाराम परब
पाटणकर-चौगुले तिठा, बिरोडकर टेंब, बाबा बिरोडकर मार्ग, न्यू सबनीस वाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*💁🏻‍♂️मोबाईल नंबर ⬇️*
*_📱९४२०२६१५८४_*
*_📱९४०३७०१५८५_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!