ओसरगाव तलाव विकासासाठी आणि सुशोभीकरणासाठी बबली राणे यांचे आमरण उपोषण..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴कणकवली,दि.१६: तालुक्यातील ओसरगाव तलाव पर्यटन दृष्ट्या विकसित होण्यासाठी तसेच मोठ्या प्रमाणात निधी मिळावा या मागणीसाठी ओसरगाव माजी उपसरपंच चंद्रहास उर्फ बबली राणे यांनी १५ जानेवारी रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून तलावाकिनारी आमरण उपोषण छेडले आहे. मागण्या तडीस जाण्यासाठी ठोस कारवाई करा. अन्यथा १६ जानेवारी रोजी स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी तलावात जलसमाधी घेण्याचा निर्वाणीचा इशारा बबली राणे यांनी दिला आहे.

तलाव लिकेज, नाना-नानी पार्क, जाँर्गिग पार्क, उपाहारगृह, पर्यटकांसाठी एक्सेंचेंज रूम, हायमास्ट व तलावाच्या चारी बाजूने पथदीप पर्यटकांसाठी सेल्फी पॉईट बनवून ओसरगाव तलाव पर्यटन दृष्ट्या विकसित करावे. राष्ट्रीय महामार्ग पासून परबवाडी, अपराजवाडी, बौद्धवाडी, गावठणवाडी, सडेवाडी, मळीवाडी लिंग माऊली मंदिर कडे ओसरगाव तलावाकडून जाणारा रस्ता तयार करावा, या मागणीसाठी बबली राणे यांनी आमरण उपोषण छेडत जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे.

यावेळी कणकवली पंचायत समितीचे सभापती मनोज रावराणे, पंचायत समिती सदस्य प्रकाश पारकर, ओसरगाव विभागाचे पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, लघु पाटबंधारे उपविभाग कणकवली उपअभियंता पी. आर. पाटील, कनिष्ठ अभियंता बशीर तरटे, अभियांत्रिकी सहाय्यक व्हि.पी. लिंगरज यांच्यासह उपोषण स्थळी जात बबली राणे यांची भेट घेतली.

ओसरगाव तलावाच्या आजूबाजूस असलेल्या सांडव्याच्या पलीकडे नागरिकांना ये-जा करण्यासाठी हामु पाईप काँजवे बांधकाम व संरक्षक भिंत बांधण्यासाठी ५९.२४ लाखाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून निविदा प्रक्रिया सुरू आहे. तलाव लीकेज साठी प्रस्ताव केला जाईल. रस्ता कामासाठी १० लाखाचे टेंडर लावण्यात आले आहे. यासाठी आवश्यक नाहरकत खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून देण्यात येईल असे सांगत सभापती रावराणे यांच्या कडून सकारात्मक चर्चा करण्यात आली .

यावेळी ओसरगाव ग्रामपंचायत माजी उपसरपंच प्रदीप तळेकर यांनी ही उपोषणाला पाठिंबा दिला आहे. यांच्यासह सुदर्शन नाईक, राहूल आंगणे, भगवान गावडे आदी सह बबली राणे यांच्या मातोश्री अलका राणे आदी उपोषाणाला ग्रामस्थ उपस्थित होते.

उपस्थित अधिकार्यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, लेखी ठोस आश्वासन दिल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा इशारा बबली राणे यांनी दिला.

_*🔥वर्षभराची जाहिरात केवळ १५ ते २० रुपयात..💥*_
💫डेट कॅलेंडर १५ रुपये (६ पानी आर्ट पेपर) (फर्मच्या नावे छपाई २०० पासून) साईज 10″×15″
💫पॉकेट डायरी २० रुपये (रेक्झीन कवर, छपाईसहित)
💫 विविध प्रकारच्या डेट डायऱ्या..
💫टेबल कॅलेंडर्स ५५ रुपये पासुन..
💫पॉलि कॅलेंडर्स १२ रुपये पासुन..
💫आधुनिक प्रकारचे नायलॉन, प्रिइंक शिक्के..
_*🌈खास एल.आय.सी. एजंट साठी उपयुक्त डेट कॅलेंडर व फाईल्स; शिवाय विविध प्रकारच्या भेटवस्तू 🤷🏻♂️*_
*💁🏻♂️ आमचा पत्ता ⬇️*
प्रसाद ऑफसेट, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*🙋🏻♂️मोबाईल नंबर ⬇️*
_*📱7057956111*_
_*📱9422065195*_
*💁🏻♀️ व्हाट्सअप नंबर ⬇️*
_*📲9822856111*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

