सावंतवाडी-सातार्डा एस्.टी. येत्या आठ ते दहा दिवसांत सुरू करणार; एसटी प्रशासनाकडून लेखी आश्वासन
▪️ माजी आरोग्य व शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर यांच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर एस्.टी. प्रशासनाचा निर्णय..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.१६: सद्यस्थितीत मुंबई येथील बेस्टच्या उपक्रमासाठी सावंतवाडी आगारातून १५ एसटी बसेस तसेच २० चालक, २० वाहक पाठवण्यात आल्याने कर्मचारी आणि गाड्यांच्या कमतरतेमुळे वस्तीच्या गाड्या सुरू करण्याबाबत अडचणी निर्माण होत आहेत. मात्र, शालेय वस्तीच्या फेऱ्या सुरू करण्याबाबत सकारात्मक प्रयत्न सुरू असून पाडलोसमार्गे सावंतवाडी-सातार्डा ही एसटी येत्या आठ ते दहा दिवसांत सुरू करणार असल्याचे लेखी आश्वासन एसटी प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
सावंतवाडी पाडलोसमार्गे सातार्डा वस्तीची गाडी बंद असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह बाजारपेठेमध्ये भाजीपाला विक्रीसाठी जाणाऱ्या ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाबद्दल माजी आरोग्य व शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर यांनी सावंतवाडी आगार व्यवस्थापक वैभव पडोळे यांचे लक्ष वेधले होते. तसेच आठ दिवसांत एसटी बस सुरू न केल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा दिला होता. या इशाराऱ्यानंतर एसटी प्रशासनाकडून सदर गाडी आठ ते दहा दिवसांत सुरू करण्याचे लेखी आश्वासन आगार व्यवस्थापकांनी श्री.तळवणेकर यांना दिले आहे.
सातार्डा येथून सकाळी सहा वाजता सुटणारी सदर गाडी साटेली, कोंडुरे, आरोस बाजार, पाडलोस, मडुरा, रोणापाल, शेर्ले गावातील नागरिकांसह विद्यार्थ्यांसाठी सोयीची ठरते. आठ ते दहा दिवसांत गाडी सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांची शालेय शिक्षणासाठी खासगी वाहतुकीची होणारी परवड थांबणार असून आमच्या पाठपुराव्याला यश आले असे, पाडलोस माजी सरपंच अमिषा पटेकर यांनी सांगितले.
*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*
*🤷🏻♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻♀️*
*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻♂️_*
*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘
_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_
*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*
*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*
*🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._
*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

