गोवा शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सिंधुदुर्गच्या शूटर्सचा जलवा

गोवा शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सिंधुदुर्गच्या शूटर्सचा जलवा

पटकावली तब्बल सात सुवर्णपदके चारही खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र

गोवा-
यश शूटिंग हब, मांद्रम गोवा येथे नुकत्याच झालेल्या सहाव्या ऑल गोवा राज्य शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्यंत गोव्याच्या संघातून खेळणाऱ्या सिंधुदुर्गच्या चार खेळाडूनी तब्बल सात सुवर्णपदकांची कमाई करीत राष्ट्रीय शुटिंग स्पर्धेसाठी आपती पात्रता सिद्ध केली. सुवर्णपदक विजेत्या या खेळाडूमध्ये कु अवनी भागले, कु श्रीया नाखरे, श्री अतुल नाखरे आणि माजी राष्ट्रीय नेमबाज अँड विक्रम भांगले याचा समावेश आहे तर रोप्यपदक विजेता जयवंत घोगळे याचा समावेश आहे.
माद्रम-गोवा येथे झालेल्या या स्पर्धेत सावंतवाडीच्या मिलाग्रिस हायस्कूलची विद्यार्थिनी अवनी मेघ-शाम मागले हिने १० मीटर पिस्तूल चॅम्पियनशिप सब युथ क्रीडा प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली श्रीया अतुल नाखरे हिने १० मीटर पिस्तूल वुमन सिनियर ज्युनियर व युथ चऍम्पियनशिप पा तिन्ही
गटातून तीन सुवर्णपदके पटकावली आंतरराष्ट्रीय नेमबाज अतुज नाखरे यांनी १० मीटर पिस्तूत सिनियर व २५ मिटर स्टैंडर्ड पिस्तूल या दोन्ही प्रकारात प्रथम क्रमांक पटकावत दोन सुवर्णपदके पटकावली तर माजी
राष्ट्रीय नेमबाज व आंतरराष्ट्रीय शूटिंग पंच आणि प्रशिक्षक ॲड मेघ;शाम उर्फ विक्रम भागले यांनी तब्बल २० वर्षाच्या खंडानंतर प्रथमच स्पर्धेत भाग घेत १० मीटर पिस्तूल म्पियनशिप स्पर्धेत मास्टर गटात प्रथम क्रमांक पटकावत आपले सुवर्णपदकावर नाव कोरले. तब्बल सात सुवर्णपदकांची कमाई करणारे हे सर्व स्पर्धक सावंतवाडीतील असून यातील अवनी, श्रीया व अतुल याची राष्ट्रीय शूटिंग चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!