कुडाळ मतदारसंघाची – १४ टेबलवर होणार मतमोजणी
*🛑कुडाळ मतदारसंघाची – १४ टेबलवर होणार मतमोजणी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-२१:-* कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शनिवार,
२३ नोव्हेंबर रोजी कुडाळ तहसील कार्यालय परिसरात सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. १४ टेबलवर ही मतमोजणी होणार असून एकूण वीस फेऱ्या होणार आहेत. यासाठी २५८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. २३ रोजी सकाळी ८ पासून मतमोजणी सुरू होऊन दुपारी बारापर्यंत कुडाळ-मालवण मतदारसंघाचा निकाल स्पष्ट होणार आहे. सुरक्षेच्यादृष्टीने तीन टप्यांमध्ये सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती कुडाळ निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी दिली. प्रशासनस्तरावर नियोजन करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया झाली. यानंतर आता सर्वांनाच निवडणुकीच्या निकालाचे वेध लागले आहेत. राजकीयस्तरावर विविध लोकप्रतिनिधी मतांची आकडेवारी करण्यात व्यस्त आहेत, तर प्रशासन मात्र निवडणुकीची मतमोजणी व निकालाची जय्यत तयारी करण्यात व्यस्त आहे. या अनुषंगाने तहसील कार्यालय येथे मतमोजणीची जय्यत तयारी सुरू आहे. सुरक्षा यंत्रणा अतिशय कडेकोट कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात एकूण २७९ मतदान केंद्रे असून यासाठी एकूण १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. एका फेरीत १४ केंद्रांची मतमोजणी होणार आहे. एकूण वीस फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी २५८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक मतमोजणी कालावधीत सुरक्षा यंत्रणा कडेकोट ठेवण्यात येणार आहे. या मतमोजणी दरम्यान दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी अभिमन्यू हॉटेल जवळचा परिसर व एस. एन. देसाई चौक या ठिकाणचा परिसर अशा दोन ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. जागा लवकरच त्या-त्या पक्षांच्या नेत्यांना सांगण्यात येतील, अशी माहिती कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_