कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडी

दीपक केसरकरनी मायनिंग बाधितांना वाऱ्यावर सोडले – जयप्रकाश चमणकर

*🛑दीपक केसरकरनी मायनिंग बाधितांना वाऱ्यावर सोडले – जयप्रकाश चमणकर*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि- ०९:-* आजगाव परिसरात मायनिंग प्रकल्प येत आहे. या प्रकल्पाला तेथील ग्रामस्थांचा विरोध आहे. मात्र, या मतदारसंघाचे आमदार असूनही शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नाहीत. त्यांनी ग्रामस्थांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप वेंगुर्ल्याचे माजी सभापती जयप्रकाश चमणकर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला. आजगाव परिसरातील मायनिंगबाधित ग्रामस्थांनी जो लढा सुरू केला आहे, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा राहील, असे चमणकर यांनी स्पष्ट केले. पंचतारांकीत हॉटेलसारखे प्रकल्प आणि बाजूलाच मायनिंगसारखे प्रकल्प सुरू करून मंत्री दीपक केसरकर नेमके काय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत? त्यामुळे आजगावात सुरू होणाऱ्या मायनिंग प्रकल्पाबाबत पुर्नविचार करावा, अशी मागणी चमणकर यांनी केली. दरम्यान, लोकांना विश्वासात न घेता सुरू असलेल्या या मायनिंग प्रकल्पात बाधित होणारी घरे तरी वगळावीत. लोकांच्या भावनांबाबत कोणी निष्वर होऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. चमणकर यांनी सोमवारी माजी आमदार राजन तेली यांच्या कार्यालयात उपस्थिती दर्शविली होती. त्यावेळी त्यांनी मायनिंगबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, या ठिकाणी मायनिंगला येथील जनतेचा प्रचंड विरोध आहे. अशा परिस्थितीत स्थानिक लोकांना विश्वासात न घेता कोणी प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला आम्ही तीव्र विरोध करू. या ठिकाणी प्रकल्प राबविताना स्थानिक जनतेला विश्वासात घेणे गरजेचे होते. मात्र, दुर्दैवाने तसे झाले नाही. त्यामुळे रविवारी झालेल्या बैठकीत एकजुटीने विरोध करण्याचा निर्णय आम्ही घेतला असून प्रसंगी आंदोलन करण्याची आमची तयारी आहे, असे चमणकर म्हणाले.
जर्मनीत नोकऱ्या देण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी जिल्ह्यातच रोजगार निर्मिती करावी. येथे रोजगार निर्मिती करण्यात अपयश आल्यामुळेच आता अन्य देशात नोकऱ्यांसाठी युवकांना पाठविण्यात येत आहे, असे चमणकर म्हणाले. राज्य शासनाने कोकणपट्टीत सिडकोमार्फत विकास करण्याचे ठरविले आहे. परंतु यामुळे ग्रामपंचायतीचे हक्क हिरावून घेतले जाणार आहेत. ही बाब अन्यायकारक असल्याचेही चमणकर यांनी स्पष्ट केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!