राजकीय

अवैध व्यवसायांवर कठोर कारवाईसाठी मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली होती पोलीस निरीक्षक यांची भेट..

▪️रातोरात कुडाळ पोलिसांकडून लाखो रुपयांचा गुटखा जप्त..

▪️तरुण पिढी व्यसनाधीन होऊन निष्क्रिय बनत असल्याने बेकायदा व्यवसायांचा मुळासकट बीमोड करावा; मनसे आक्रमक

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.०५: महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ शिष्टमंडळाने कुडाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री. कोरे यांची काल भेट घेऊन तालुक्यातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी स्मरणपत्र निवेदन सादर केले.कुडाळ तालुक्यात जुगार,मटका व गावठीसह गोवा बनावटीची दारू विक्री आदि अवैध व्यवसाय मागील काही कालावधीपासून फोफावू लागत असल्याने जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाणही वाढू लागल्याचे चित्र आहे.अशा अनैतिक व्यवसायांवर काही पोलीस कर्मचाऱ्यांचा वरदहस्त असल्याने अवैध व्यवसायांविरोधात भूमिका घेणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांवर व प्रामाणिक पोलीस कर्मचाऱ्यांवर दहशत निर्माण करून आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत.ज्यामुळे ठिकठिकाणी माफियाराज बोकाळल्याची परिस्थिती निर्माण झालेली असल्याने तालुक्यातील कायदा सुव्यस्था बिघडू नये व या अवैध व्यवसायांना आळा बसावा यासाठी मनसेच्या वतीने याआधी ही पत्रान्वये आपले लक्ष वेधले होते. मात्र पोलीस प्रशासनाकडून अशा व्यवसायांवर व व्यावसायिकांवर अद्याप ठोस कारवाई झाल्याचे दिसून येत नाही.याउलट मागील काही कालावधीपासून अशा बेकायदा व्यवसायांत वाढ झाल्याचे तालुक्यातील स्थानिक जनतेकडून नेहमी सांगण्यात येत आहे हे दुर्दैवी आहे.काही दिवसांपूर्वी मनसेच्या माध्यमातून तालुक्यात गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तींना रंगेहाथ पकडून देत या विक्रीमागच्या खऱ्या सूत्रधारांचा शोध घेवून मुळासकट बिमोड करावा अशा अपेक्षेने आपल्या ताब्यात देण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने आपले कर्मचारी शोधमोहिम करत आहेत ह्यात दुमत नाही मात्र या व्यवसायामागचे खरे सूत्रधार अद्याप पर्यंत मोकाट असून उजेडात आलेले नाही.शिवाय सोबत मटका जुगार अशा प्रकारांवर देखील त्याच कडवटपणे कारवाई होणे अपेक्षित आहे.कुडाळ  तालुक्यात सर्व भागांमधून मटका गोळा करणारे एजंट सर्हासपणे वावरताना दिसत असून उघडपणे संकलन केंद्र उघडून आहेत. हे सर्व प्रकार काही पोलीस कर्मचाऱ्यांना हाताशी धरून उघडपणे चालले आहेत असे चित्र आहे.याकडे गंभीरपणे लक्ष वेधून कुडाळ पोलीस ठाण्याने कठोर कारवाईची धडक मोहीम हाती घ्यावी यामध्ये मनसेचे महाराष्ट्र सैनिक आपल्याला व्हाट्सअप संदेश वहनाच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यातील अवैध व्यवसायाची ठिकाण,व्यवसाय करणारे व्यक्ती आदींबाबत सर्व माहिती पुरवणार असून पोलीस प्रशासनाच्या जबाबदार अधिकाऱ्यांकडून अवैध व्यवसायांचा मुळासकट बिमोड करण्यासाठी  प्रामाणिक सहकार्य व प्रबळ इच्छाशक्तीची अपेक्षा आहे.त्यामुळे आजची तरुण पिढी व्यसनाधीन होवून निष्क्रिय  होईल हे भविष्यातील संकट ओळखून गांभीर्यपूर्वक अवैध व्यवसायांविरोधी धडक कारवाई मोहीम तात्काळ हाती घ्यावी अशी मागणी मनसेने दिलेल्या निवेदनातून करण्यात आलेली आहे.

🕉️ *||श्री||*
*||आरोग्यम् धनसंपदा||*

🛐 *आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगांव येथे प्रथमच नव्याने सुरू झाले आहे.

🏥 *जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगांव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी…..!
*अँक्यू नेचर क्युअर  पर्वरी-गोवा संचलित….!*

‼️ *निसर्गोपचार चिकित्सा केंद्र*‼️
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला.

✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!*
♨ *आहार हेच तुमचे औषध*
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.

‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटांचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या

*💥सांध्याचे आजार :-*
मान, पाठ, कंबर, गुडघा, टाच दुखी, शोल्डर पेन, सायटिका, स्पॉन्डिलाइटिस, वाताचे आजार, संधिवात/ आमवात
*💥 शारीरिक /मानसिक विकार :-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी, मायग्रेन (अर्धशिशी) झोप न येणे.
*💥पोटाचे विकार :-*
अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, पोटदुखी, मुळव्याध, कावीळ.
*💥लहान मुलांचे आजार :-*
दमा, ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे, स्मरणशक्ती वाढविणे.
*💥स्त्रियांचे विकार /आजार :-*
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार, हार्मोन इन बॅलन्स, रक्त कमी होणे, शारीरिक /मानसिक अनेक समस्या.

  ✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर  गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड  विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी   ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध उपचार सुविधा:~*
☑योग🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉

*💫आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार🧘‍♂️🧎🏽
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️  24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣

*उपचाराची वेळ-*
*सकाळी-*🌅 ८.०० ते *दुपारी-* २.००, *सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००

*टीप-*  उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.

☎️ *संपर्क* – *९४०३८२७२६१,८३२९३३१७२०*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!