छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ या योजनेच्या लाभापासून जिल्ह्यातील जवळपास २५०० शेतकरी लाभापासून अद्यापही वंचित..
▪️मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी वेधले जिल्हाधिकऱ्यांचे लक्ष..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴कुडाळ,दि.१९: शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ या योजनेपासून जिल्ह्यातील जवळपास २५०० शेतकरी अद्यापही वंचित असल्याने मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून त्यांचे लक्ष वेधले व प्रलंबित लाभधारक शेतकऱ्यांना तात्काळ लाभ मिळण्यासाठी शासनाशी पत्रव्यवहार करावा अशी विनंती केली आहे.
यामध्ये महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना कर्जाच्या बोजातून दिलासा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ ही कर्जमाफी योजना अंमलात आणली होती. त्यानुसार शासनाने जिल्ह्यातील कर्जदार शेतकऱ्यांचे ऑनलाईन प्रणालीने अर्ज मागविले होते. सदरील अर्जांची छाननी होवून मंजुरी दिलेल्या ग्रीन लिस्ट यादी नुसार शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले होते. मुदतीत तसेच कर्ज परतावा केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर २५ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात आले होते. जिल्ह्यात सदरील योजनेत पात्र ठरलेले ग्रीन लिस्ट यादीत समाविष्ट असलेले जवळपास २५०० शेतकरी अद्यापही लाभापासून वंचित आहेत. याबाबत जिल्हा सहकार विभाग कार्यालयाकडून माहिती घेतली असता त्यांनी सदरील योजनेतील अनुदान वाटप प्रक्रिया सहकार आयुक्त पातळीवरून होत असल्याने ‘महाऑनलाईन’ या बाह्यस्त संस्थेद्वारे नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे.
सद्यास्थित आघाडी सरकारने शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमुक्ती योजना अंमलबजावणी चालू केल्याने मागील योजनेतील अनुदान वाटप कामकाजावर पूर्णतः दुर्लक्ष झालेले आहे. परिणामी शेतकरी आपल्या हक्काच्या लाभापासून वंचित राहिला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा लाभ मिळणेसाठी आयुक्त सहकार विभाग यांचे कार्यालयाशी पत्रव्यवहार करून मागील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ या योजनेच्या कामकाजाबाबत लक्ष वेधावे व शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा लाभ मिळवून द्यावा अशी विनंती सदर निवेदनातून करण्यात आली आहे.
*😍☺️🏠 बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

