अनधिकृत वाळू व्यवसायामुळे महसूल यंत्रणेच्या ‘रॅम्प तोड’ धडक कारवाईचे मनसे कडून स्वागत..
▪️बेकायदेशीर होड्या व परराज्यातील अवैध वास्तव्य करणाऱ्या स्थलांतरित कामगारांवर कारवाई कधी?
▪️’मनसे’चे उपतालुकाध्यक्ष दिपक गावडे यांचा सवाल..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴कुडाळ,दि.०६: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेच्या हक्काची वाळू ही बेकायदेशीरपणे गोवा राज्यात विक्री करून महाराष्ट्राचा महसूल बुडवून अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी ‘मनसे’ने याबाबत कठोर भूमिका घेतली होती. शिवाय स्थानिक जनतेला हक्काची वाळू ही ८ ते १० हजार रुपयांना मिळणे अभिप्रेत आहे. तीच वाळू परराज्यात मोठ्या किंमतीस विकली जात असल्याने जिल्ह्यातील जनतेला मिळणे कठीण झालेली आहे. त्यामुळे मनसे त्याबाबत आक्रमक असल्याने जिल्हा प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेऊन कुडाळ व मालवण मधील अनधिकृत वाळू उपसा करणारे रॅम्प तोडून धडक कारवाई केली. या कारवाईचे मनसे कडून स्वागत आहेच! मात्र, लगेच दुसऱ्या दिवशी नव्याने रॅम्प बांधणी करून अवैध वाळू उपसा चालू झाला. त्यामुळे जिल्हा महसूल प्रशासनाने खाडी परिसरातील अनधिकृत होड्या व परराज्यातून आलेले जिल्ह्यात बेकायदेशीर वास्तव्य करणारे स्थलांतरित कामगार यांच्यावर कठोर कारवाई करावी तरच वाळू चोरीला चाप बसेल. अनियंत्रित वाळू उपसा असाच चालू राहिला, तर महसूलचे अधिकृत वाळू लिलाव घेणार तरी कोण हा खरा प्रश्न आहे. मुळात आंतरराज्य स्थलांतर कायद्यानुसार परराज्यातून आलेल्या स्थलांतरित कामगारांची संबंधित पोलीस स्टेशन किंवा कामगार कार्यालय यांचेकडे नोंदणी होणे हे बंधनकारक आहे. असे असताना अशा प्रकारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोण येतं, कोण जातं याची कोणतीही नोंदणी होत नसल्याने जिल्ह्यातील गुन्हेगारी आपसूक दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. खऱ्या अर्थाने जिल्ह्याचा हक्काचा महसूल बुडवून अनधिकृतपणे चाललेल्या वाळू व्यवसायावर चाप बसवायचा असेल तर बेकायदेशीर होड्यांवर सुद्धा कारवाई होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे खाडी लगतचे जमीनदार ज्यांच्या आवारात रॅम्प बांधकाम केले जाते, वाळू भरणा केली जाते. अशा जमीनदारांना नोटिसा देण्याची कारवाई महसूल प्रशासनाने करावी अशी मनसेची आग्रही मागणी आहे. अन्यथा मनसेची आंदोलनाची भूमिका ही कायम राहील याची नोंद महसूल प्रशासनाने घ्यावी, असा इशारा मनसेचे कुडाळ उपतालुका अध्यक्ष दीपक गावडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_