पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात शिवसेनेचे “आक्रोश आंदोलन” म्हणजे जनतेची क्रूर थट्टाच..
▪️केंद्रातील भाजप व राज्यातील शिवसेना पेट्रोल व डिझेल विक्रीच्या नावाखाली चालवत आहेत “वसुलीकेंद्र”..
▪️राज्यातील सत्ताधारी शिवसेनेचा राज्यव्यापी आंदोलना आडून स्वतःची जबाबदारी झटकण्याचा डाव; मनसेची घणाघती टीका
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴कुडाळ,दि.०५: केंद्रातील भाजप व राज्यातील शिवसेना या पक्षांमध्ये जनतेची पिळवणूक करायची, कोणी किती लुटायचं आणि नवीन करांचा बोजा माथी मारायचा याची जणू स्पर्धाच लागलेली आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. यामध्ये सामान्य माणूस वाढलेल्या महागाईच्या झळांनी रोज किती मरण यातना भोगतो आहे याची किंचितही जाणीव या नादान राज्यकर्त्यांना नाही या गोष्टीचे नवल वाटते.पेट्रोल डिझेल इंधनांचे भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून शतकाच्या उंबरठ्यावर पोहचले आहेत तरीसुद्धा राज्यकर्ते एकमेकांवर टीका टिप्पणी करून नौटंकी करण्यात धन्यता मानत आहेत हे दुर्दैव आहे. एकीकडे राज्यकर्त्यांकडून पेट्रोल डिझेल विक्रीच्या नावाखाली जनतेची अक्षरशः पिळवणूक होत असताना राज्यातील सत्ताधारी शिवसेना स्वतःच राज्यव्यापी आंदोलन पुकारून जनतेची जणू क्रूर चेष्टाच करत आहे अशी जनतेची भावना आहे. आधी कोरोना संचारबंदी, त्यातून ठप्प अर्थव्यवस्था, वाढलेली बेरोजगारी व महागाईमुळे सामान्य माणसाची जगण्यासाठी चाललेली धडपड व एकूण संघर्ष संघर्ष याचे किंचितही सोयरसुतक केंद्रातील व राज्यातील सरकारांना उरलेले नाही.पेट्रोल व डिझेल वर केंद्र व राज्य सरकार मिळून प्रति लिटर जवळपास 58℅ कर वसुली करत असून लूटमारी करत आहेत. सोमवारी तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रातील पायाभूत विकासासाठी पेट्रोल व डिझेल विक्रीवर अधिक उपकर घेण्याची घोषणा केली ज्यामुळे पेट्रोल प्रति लिटर अडीज रुपये तर डिझेल चार रुपये महाग होणार आहे.सर्व स्तरातून यावर नाराजीचा सूर असून जनतेमध्ये उद्रेकाची भावना आहे मात्र अशावेळी राज्यातील सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने काही अंशी करात सवलत देऊन जनतेला दिलासा द्यावा हे अभिप्रेत असताना दरवाढीच्या मुद्यावर आंदोलन करतेय ह्याला स्वतःची जबाबदारी झटकण्याचा प्रकार म्हणावा लागेल. भाजप व शिवसेनेने राजकीय नौटंकी करण्यापेक्षा करात कपात करून जनतेला दिलासा दयावा अन्यथा येत्या काळात मुजोर राज्यकर्त्यांना जनताच धडा शिकवेल अशी घणाघाती टीका मनसेचे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
*_💥पोल्ट्री साहित्याच्या शोधात आहात? चिंता सोडा..💥_*
🌈आमच्या दर्जेदार, टिकाऊ व माफक दरातील पोल्ट्री साहित्याचा अनुभव घ्या! आणि सोडा सुटकेचा निश्वास..😊
_*🐓🔥 सिश्रायु पोल्ट्री सर्व्हिस 🔥🐓*_
_*💫आमच्याकडे पोल्ट्री साठी लागणारी जाळी, खाद्य भांडी, पाणी भांडी, ताडपत्री, भुसा ढवळण्याची मशीन इत्यादी साहित्य माफक दरात मिळेल..*_
*🤷🏻♂️ संपर्क ⬇️*
श्री. अमित देसाई,
निळेली (माणगाव)
तालुका. कुडाळ, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*🤷🏻♀️ मोबाईल नंबर ⬇️*
_*📱9403559599*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_