राजापूर तालुका विकासाच्या बाबतीत शेवटचा गणला जातो हे दुर्दैव; खासदार सुरेश प्रभु
▪️आत्मनिर्भर बनण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करूया; प्रभुंचे आवाहन
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : अद्वैत अभ्यंकर
🎴राजापूर,दि.०४: कित्येक वर्षांपासून राजापूर तालुका हा विकासाच्या बाबतीत शेवटचा गणला जातो हे दुर्दैव आहे. तालुक्याचा अपेक्षित विकास झालेला नाही. आजही तालुक्यात मुलभूत सुविधांसह चांगल्या दर्जाच्या आरोग्य, शिक्षण सेवांची कमतरता आहे. राजापूर तालुक्याचे किंबहूना कोकणचे हे चित्र बदलण्यासाठी येथील सर्वसामान्य शेतकरी, मच्छीमार, महिला यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करूया, असे आवाहन माजी केंद्रीय रेल्वे मंत्री खासदार सुरेश प्रभु यांनी राजापूर येथे बोलताना केले.
माजी केंद्रीय रेल्वे मंत्री खा. सुरेश प्रभु सोमवारी राजापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी शहरातील राजापूर हायस्कूलच्या कलामंदिर सभागृहात आयोजित एका कार्यकमाच्या निमित्ताने तालुक्यातील विविध सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी तसेच भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ग्रामीण भागात स्वयंरोजगार तयार करण्यासाठी गावांमध्ये परिवर्तन केंद्र तयार करण्यात येणार असून या परिवर्तन केंद्रांच्या माध्यमातून महिला तसेच तरूणांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे खा. सुरेश प्रभु यांनी सांगितले.
आत्मनिर्भर भारत हे पंतपधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी ग्रामीण भागातील प्रत्येक कुटूंब आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीनेच परिवर्तन केंद्रामार्फत पयत्न केले जाणार आहेत.
विशेष करून महिला सक्षमिकरणावर भर दिला जाणार आहे. कारण जर एक महिला स्वतःच्या पायावर उभी राहिली तर संपूर्ण कुटुंब सक्षम होईल. महिलेचे उत्पन्न वाढले तर कोणत्याही पुरूषाचा हात महिलेवर उचलला जाणार नाही, असेही खा.प्रभु यांनी सांगितले. त्याचपमाणे शेतकऱ्यांना परिवर्तन केंद्रामार्फत नाबार्डच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान अवगत होऊन त्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी मदत होईल, असेही ते म्हणाले.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी, मच्छीमार, महिला यांना राहत्या घरीच उत्पन्न कसे वाढेल याकरीता प्रशिक्षित केले जाणार असून या परिवर्तन केंद्र चळवळीच्या माध्यमातून आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण भारत बनविण्यासाठी सर्वांनी मिळून काम करूया, असे आवाहन खा.प्रभु यांनी केले.
यावेळी खा.प्रभु यांनी राजापूर तालुक्याच्या विकासाबाबत बोलताना मागील अनेक वर्षात तालुक्याचा अपेक्षित विकास झालेला नसल्याची खंत व्यक्त केली. आपण मंत्री असताना रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजेच्या सोयीसाठी २०० कोटी उपलब्ध करून दिले. त्यातून राजापूर तालुक्यासाठी स्वतंत्र सबस्टेशन झाले. पंतपधान ग्रामसडक योजनेची सुरूवात राजापूर तालुक्यातून झाली. त्यानंतर या योजनेच्या माध्यमातून अनेक रस्ते झाले. मात्र सध्या राजापूर तालुक्यात मुलभूत गरजा भागविण्यासाठी प्रतिक्षा करावी लागते हे दुर्दैव आहे. आरोग्य, शिक्षण सुविधांच्या बाबतीतही फार बिकट स्थिती आहे. स्थानिक लोकांना नोकरी आणि रोजगार नाही, आणि म्हणूनच आमच्या कोकणातील तरूण, तरूणींना भवितव्य काय? हा पश्न सोडविण्यासाठी, कोकणवासीयांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे खा.प्रभु यांनी सांगितले.
या कार्यकमाला व्यासपीठावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, माजी आमदार प्रमोद जठार, राजापूर तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव, राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सौ. छाया जोशी आदी उपस्थित होते.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

