कोकणशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

५५ व्या दिवशी आंदोलन सुरूच! आता माघार नाही; बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांचा इशारा

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सिंधुदुर्गनगरी

🎴सिंधुदुर्गनगरी,दि.०४: जिल्हा परिषदेचे आर्थिक सल्लागार, शोषित पीडित समाज कल्याणाचे कागदावरचे उध्दारकर्ते तीन पदांचे सोयरे मदन मोहन भिसे आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांच्या रजा कालावधीतील औट घटकेचे पदोन्नती समितीचे अध्यक्ष राजेंद्र पराडकर यांनी आमच्या दिनांक १० नोव्हेंबर २० च्या पत्राला जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून वर्तमानपत्रात बातमी देऊन नवबौद्धांसह सर्व वाचकांची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या २६ ऑक्टोबर २००४ शासन निर्णयानुसार पदोन्नती कार्यपद्धतीचे पालन केले नाही हे सिद्ध झाले. परंतू सिंधुदुर्ग जिल्हा जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यावर मुग गिळून गप्प का आहेत? हे अनाकलनीय आहे की, ते जाणिवपूर्वक दुर्लक्षित करून मागासवर्गीयांवर अन्याय करत आहेत. असे म्हणायचे का? शासन निर्णयामध्ये पदोन्नती करता निवड सूची ही प्रत्येक सेवाभरती वर्षांमध्ये १ सप्टेंबर ते ३१ ऑगस्ट अशी तयार करावी असे स्पष्ट आदेश दिले असतानाही वित्त विभागाचे प्रभू अवताराचे कृतीतून सुद्धा आणि नुकतेच सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या पदोन्नत्यांवेळी सुद्धा त्यांनी हा शासन आदेश बासनात गुंडाळून ठेवल्याचे सिध्द झाले. या आदेशाप्रमाणे पदोन्नती निवड सूची केलेली नाही. हे सिद्ध झाले. या आदेशाचे तंतोतंत पालन मदन भिसे, राजेंद्र पराडकर यांनी केले असेल तर त्यांनी तसे पुराव्याचे कागदपत्रे का देत नाहीत? हा रावजी यादव यांचा सवाल आहे. उलट ज्या या हितसंबंधी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत माहिती नव्हती ती म्हणजे त्यांनी जिल्हा परिषद उत्पन्नातून निर्माण केलेली पदे कशी? का? आणि कुणाच्या सोईसाठी? की, मागासवर्गीयांच्या छळासाठी? पद निर्माण केली? याबाबत आम्ही अनभिज्ञ होतो, पण त्यांनीच ही भांडाफोड केल्यामुळे ती अशी की जिल्हा परिषद फंडातून निर्माण केलेल्या पदभरतीची माहिती शासन गेली १२ वर्ष मागणी करत असल्याचे उघडकीस आले. पण ती हितसंबंधीतांना वाचविण्यासाठी ती माहिती शासनाला आतापर्यंत पाठवलीच नाही हे निदर्शनास आले. हे इतके पारदर्शक असतील तर या जिल्हा फंडातील पदांची भरतीची माहीती शासनाला पाठविण्याची हिंमत दाखवतील का? हा खरा प्रश्न आहे. त्यांनी आपल्या स्वाक्षरीने प्रसिद्ध केलेल्या बातमी नुसार त्याप्रमाणे कागदपत्रे मला आजपर्यंत दिले का नाहीत? म्हणूनच आजचा आंदोलनाचा ५५ वा दिवस उजाडला आहे. जोपर्यंत आवश्यक ती कागदपत्रे मिळत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रमुख के. मंजुलक्ष्मी जिल्हाधिकारी यांना कळविले आहे. असे भारतीय बौध्द महासभेचे तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*

*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*

*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*

*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*

*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*

*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*

*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/

*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/

*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/

*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/

*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*

*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*

*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*

*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*

  *🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!