सिंधुदुर्गात होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगची मान्यता प्राप्त व्हावी..
▪️माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना सावंतवाडी, कणकवली, मालवण, शिरोडा येथील युवकांची निवेदने..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.०७: सिंधुदुर्ग जिल्ह्याला मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय होण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (एनएमसी)ची मान्यता प्राप्त व्हावी यासाठी पंतप्रधानांचे शेर्पा, राज्यसभा खासदार व माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची जिल्ह्यातील युवकांनी सावंतवाडी, कणकवली, मालवण, शिरोडा या तालुक्यात श्री सुरेश प्रभू यांनी दिलेल्या भेटी वेळी त्यांची भेट घेऊन निवेदने दिली आहेत.
यावेळी ४ जानेवारी रोजी कणकवली येथील भाजप कार्यालयात श्री सुरेश प्रभू यांनी भेट दिली असता जिल्ह्यातील युवकांनी तिथे त्यांची भेट घेऊन निवेदन दिल्यानंतर श्री सुरेश प्रभू यांनी आपण यासाठी विशेष लक्ष घालून जिल्ह्याला मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय होण्यासाठी केंद्रातून राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (एनएमसी)ची मान्यता प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करेन असा शब्द त्या युवकांना दिला आहे.
जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आवश्यक असून, माझ्या प्रिय जिल्ह्याला आरोग्य सारख्या प्रश्नासाठी दुसऱ्या जिल्ह्यावर अवलंबून रहावे लागू नये यासाठी केंद्रातील आपली ओळख व राजकीय वजन वापरून लवकरात लवकर एन एमसीची मान्यता मिळवून देईन असा विश्वास त्यांनी दिला आहे.
यावेळी कणकवली येथे निवेदन देताना तुषार राणे, लक्ष्मण गावडे, प्रभाकर परब, सौरभ नागोळकर आणि शुभम घावरे आदी युवकांनी यावेळी भेट घेतली होती.
*_🚴♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴♂️_*
*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*
🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स
*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚
*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com
*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*
*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_