सावंतवाडी माठेवाडा येथे सावित्रीबाई फुले जन्मदिनानिमित्त युवतींची रॅली..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.०३: स्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी, समस्त स्रियांना उजेडाची वाट दाखविणाऱ्या “क्रांतीज्योती” सावित्रीबाई फुले यांच्या जयंती उत्सवानिमित्त सावंतवाडी येथील सुधाताई वामनराव कामत जि. प. प्राथमिक शाळा अंगणवाडी क्रमांक ६६ च्या चार वर्षाच्या मुलांनी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषा करून सोशल डिस्टंसिंगने रॅली काढली आणि स्त्री शिक्षणाबद्दल जनजागृती केली.

या रॅलीमध्ये स्त्री शिक्षणाबद्दल चे महत्त्व पटवून देणारे फलक घेऊन युवतींनी जनजागृती केली. “मुलगी झाली प्रगती झाली” “मुली शिक्षण घेतील आणि समृद्ध होतील” “मुलगी वाचवा मुलगी शिकवा” “मुलगा मुलगी भेद नको मुलगी झाली तर खेद नको” “मुलगा पेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी” “मुलीचे शिक्षण म्हणजेच प्रगतीचे लक्षण” असे फलक  घेऊन ही रँली प्राथमिक शाळेपासून माठेवाडा परिसरामध्ये काढण्यात आली.

या रॅलीमध्ये कु. गरिमा सावंत व कु. तनिष्क मेस्त्री या चार वर्षांच्या दोन मुलांनी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या वेशामध्ये सहभाग घेतला होता.

या रॅलीमध्ये अंगणवाडी सेविका अनुराधा पवार, मदतनीस अमिषा सासोलकर तसेेेच प्रांजल मेस्त्री, रीमा पटेल, प्रगती पटेल, सानिका सासोलकर, श्‍वेता आकेरकर, नमिता सावंत आदी महिला पालक आणि किशोरीका सहभागी झाल्या होत्या.

सोशल डिस्टंसिंग पालन करुन झालेल्या या कार्यक्रमांमध्ये सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी सावित्रीबाईंच्या वेशातील गरिमा सावंत हिने सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल मनोगत व्यक्त केले. सावित्रीबाई फुले या मुलींच्या शिक्षणासाठी चंदन झिजावेे त्याप्रमाणे झिजल्या; त्या नऊ वर्षांच्या असताना शेतात काम करायच्या तेव्हा मातीत त्या अक्षरे गिरवत असत. आपले पती ज्योतिबा फुले यांच्या सोबत त्यांनी स्त्री शिक्षणाची ज्योत सर्वत्र पेटवून महिलांना शिक्षित केले. सावित्रीबाईंचा आदर्श तुम्ही आम्ही सर्व महिलांनी घ्यावा आणि त्यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. असे सांगितले.

*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*

*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*

*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..

*_🙋🏼‍♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*

*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!