कोकणक्राइमशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

‘कोकण लाईव्ह’च्या जनांदोलन इशाऱ्यानंतर राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांची जिल्हा भेट व आढावा..

▪️सिंधुदुर्गासह महाराष्ट्राच्या इतर भागात अवैध दारू पुरवठा पोहचणार नाही याची जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क खात्याने घ्यावी दक्षता; उमाप यांच्या सक्त सुचना

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह

🎴सिंधुदुर्ग,दि.०३: गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या अवैध दारू पुरवठ्या  विरोधात कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलने २६ जानेवारीला जनआंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग खडबडून जागा झाला आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देऊन जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच गोव्यातून कायमस्वरूपी अवैध दारू बंद करण्यासाठी कोणती उपाययोजना करता येईल यावर चर्चा करून यापुढे गोव्यातून अवैध दारू पुरवठा सिंधुदुर्गासह महाराष्ट्राच्या इतर भागात पोहचणार नाही. याची दक्षता जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क खात्याने घ्यावी अशा सक्त सूचना दिल्या आहेत.

कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलने गोव्यातून सिंधुदुर्गात येणारा अवैद्य मद्य पुरवठ्याबाबत जोरदार उठाव केला होता. या उठावामुळे अवैध दारू पुरवठा जवळपास ७० टक्के बंद झाला होता. तो शंभर टक्के बंद होण्यासाठी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलचा लढा सुरू होता व या लढ्याला सिंधुदुर्ग पोलीस खात्यानेही सहकार्य केल्यामुळे यश मिळत होते. सिंधुदुर्ग जिल्हयाचे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी अवैध दारू बाबत कडक पावले उचलत अनेक ठिकाणी धाडी टाकत लाखो रुपयांचा अवैध मद्य साठा जप्त केला. तसेच राज्य उत्पादन शुल्क खात्यानेही झोपेतून जागे होऊन कारवाया करायला सुरुवात केली. २६ जानेवारी रोजी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलच्या माध्यमातून जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. यामुळे राज्य उत्पादन शुल्क व पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले.

पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांच्या आदेशाची कडक अंमलबजावणी सिंधुदुर्गात होताना दिसत आहे. आज  राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी सिंधुदुर्गातील राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांची बैठक घेऊन गोव्यातून होणाऱ्या अवैध मद्य पुरवठ्यावर कडक पावले उचलली आहेत. यापुढे एखादा आरोपी पुन्हा-पुन्हा त्याच गुन्ह्यात सापडल्यास त्याच्यावर तडीपारीचा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या आहेत. यामुळे गोव्यातून येणाऱ्या अवैध मद्य पुरवठ्याला चाप बसेल. असे बोलले जात आहे.

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*♦न्यूज एडिटर : गुरुनाथ राऊळ*
*📱संपर्क : +919422686976*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!