खेर्डीत सुखाई परिवर्तन पॅनेलने फोडला प्रचाराचा नारळ
चिपळुणात ८३ ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू
प्रतिनिधी – संतोष पिलके
चिपळूण – शहरा नजीकच्या खेर्डी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सुखाई परिवर्तन पॅनलने श्री सुखाई देवीचे दर्शन घेऊन तसेच विजयासाठी साकडे घालून प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी सुखाई परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांसह नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
चिपळुणात ८३ ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून खेर्डी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दोन गट आमने-सामने आले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस, सेना, काँग्रेस दोन गटात विभागली आहे. तर भाजप बहुतांश एका गटाकडे झुकला आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर बिनविरोधचा प्रस्ताव आला. मात्र, दोन गट आमने-सामने आल्याने बिनविरोध प्रस्ताव अयशस्वी ठरला आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास दोन दिवस शिल्लक असताना खेर्डीतील एका गटातील सोमवारी सकाळी परिवर्तन पॅनल ने श्री सुखाई देवीचे दर्शन घेऊन व देवीला विजयाचे साकडे घालून प्रचाराचा नारळ फोडला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व पॅनल प्रमुख श्री. खताते तसेच चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व पॅनल प्रमुख प्रशांत यादव यांच्यासह आदी मान्यवर, सुखाई पँनलचे उमेदवार व खेर्डीतील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी सरपंच सौ. जयश्री खताते, माजी जि. प. सदस्य विजय देसाई, कमलाकर शेंबेकर, रवींद्र फाळके, काशीनाथ दाते, वासुदेव मेस्त्री, बाळा दाते, वहाब बेबल, अबू चौगुले, संदेश मोहिते, विनोद भुरण, श्रीकृष्ण राऊत, विजय शिर्के, अनिल लांजेकर, अभिजित खताते, अनिस बेबल, राजू शिंदे आदी उपस्थित होते.

