चिपी विमानतळाला साजेसे नाव द्यावे..
आमदार नितेश राणेंच्या मागणीचे मी पुर्ण समर्थन करणार नाही.. खासदार नारायण राणे
प्रतिनिधी – समीर चव्हाण
वेंगुर्ले ता.२८: सिंधुदूर्ग जिल्ह्यातील भूमिला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पदपर्श झाला आहे.त्यामुळे चिपी विमानतळाला त्याला साजेसे, असेच नाव द्यावे आमदार नितेश राणेंच्या मागणीचे मी पुर्ण समर्थन करणार नाही नावाच्या वादापेक्षा त्या ठीकाणी येणाऱ्या पर्यटकांना चांगली आणि दर्जेदार सेवा मिळावी,तसेच सर्व विमाने या ठीकाणी थांबावीत,असे मला वाटते,अशी भूमिका माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी आज मांडली.दरम्यान चिपीकडे जाणाऱ्या रस्त्यासह मोबाईल रेंज,विजेची सेवा,अशा अनेक समस्या आजही त्या ठीकाणी आहेत.त्यामुळे त्या पुर्ण करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे , तसेच ज्या परवानग्या केद्रांकडुन आणायच्या राहील्या आहेत,त्या आणण्यासाठी आपण पाठपुरावा करू, असेही त्यांनी सांगितले.श्री. राणे यांनी आज चिपी विमानतळाला भेट देत त्या ठीकाणी झालेल्या कामाची पाहणी केली.त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.यावेळी ते म्हणाले २६ जानेवारीचा मुहूर्त काढण्यात आल्याचे समजते परंतू अद्याप पर्यंत अनेक कामे प्रलबिंत आहेत.ती पुर्ण करण्याबरोबर चिपी विमानतळाकडे जाणारा रस्ता सुस्थितीत करण्याचा महत्वाचा निर्णय घेणे गरजेचे आहे.तर केद्रांकडुन आवश्यक असलेल्या परवानग्या मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे,असे त्यांनी सांगितले.