महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने उद्योगपती बशीरभाई हजवाणी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान

🟥महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने उद्योगपती बशीरभाई हजवाणी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 प्रतिनिधी :ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,१५मे: कोकणात येणाऱ्या प्रत्येक संकट काळात देवदूताची भूमिका बजावणारे दानशूर व्यक्तिमत्व गोरगरीबांचे कैवारी,कोकणातील सुप्रसिद्ध उद्योगपती बशीरभाई हजवानी यांचा महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना जिल्हा रत्नागिरी तर्फे ऑल इंडिया मुशायरा मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना,उदय सामंत यांचे पिताश्री आणि प्रसिद्ध उद्योजक अण्णा सांमत यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२२ देऊन गौरव करण्यात आला,

उर्दूत एक नजाकत आहे, लकब आहे, ती कुठल्याच भाषेत नाही. मी या भाषेच्या आधीच प्रेमात पडलोय, अशा शब्दात जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी उर्दू भाषेचा गौरव
केला. महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना जिल्हा शाखा रत्नागिरी यांच्या वतीने गुरुवारी शहरातील जयेश मंगल
कार्यालयात अखिल भारतीय उर्दू संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनादरम्यान विविध
क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख
अतिथी म्हणून ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, जिल्हा शल्य
चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, ज्येष्ठ उद्योजक रवींद्र तथा अण्णा सामंत,उद्योजक नजीर नाईक, रज्जाक काझी,
ज्येष्ठ पत्रकार अलिमियाँ काझी, उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुश्ताक तांबे, संजय वैशंपायन आदी उपस्थित
होते. महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना जिल्हा शाखा रत्नागिरी यांच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी
बजावणान्या व्यक्तींना जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात
आले. यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी
बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे
यांना सहकारभूषण, प्रसिद्ध उद्योजक
बशीर हजवानी यांना महाराष्ट्रभूषण,
नजिर नाईक यांना उद्योगरत्न, पावसचे
मन्सूर काझी, राकेश चव्हाण यांना
कोकणरल, मुकेश गुप्ता यांना
कोकणभूषण, इन्फिगोचे
व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर
ठाकूर यांना उद्योगरत्न, पत्रकार
उज्ज्वला पंगेरकर पत्रकार भूषण,
उद्योजक सुरेश गुंदेचा यांना उद्योगरत्न,
शिवसेनेचे उपशहरप्रमुख विजय
खेडेकर यांना कोकणरत्न, कोकण
मर्कटाइल बँकेचे चेअरमन नजिब
मुल्ला, फिनोलेक्सचे प्रकाश छाब्रिया.
यांचा समावेश होता.
त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात
उल्लेखनीय यश मिळविलेल्या गुणवंत
विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कारमूर्तीपैकी विजय खेडेकर आणि
डॉ. श्रीधर ठाकूर यांनी मनोगत व्यक्त
केले. विजय खेडेकर यांनी या
पुरस्कारासाठी आपली निवड
झाल्याबद्दल आयोजकांना धन्यवाद
दिले. श्रीधर ठाकूर यांनी आपण
महाविद्यालयात दुसरा विषय उर्दू
घेतला असल्याने पुढे भविष्यात ही,
भाषा विविध ठिकाणी उपयोगी-
आल्याचे सांगत उपस्थितांना धक्का
दिला. ही भाषा केवळ एका समाजाची
नसून ती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे,
अशी अपेक्षा व्यक्त केली.
संजय वैशंपायन यांनी या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. हिदायत
नाईक यांनी आभारप्रदर्शन केले..
यानंतर अखिल भारतीय उर्दू कवी-
संमेलनाला प्रारंभ झाला.या वेळी जिल्हाधिकारी डॉक्टर बी, एन, पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर ईंदुराणी जाखड, के,टीव्ही चे वृत्तसंपादक तथा वरिष्ठ पत्रकार अलिमियां काझी, संचालक रज्जाक काझी शिरगाव ग्रामपंचायत माजी सरपंच रहिमत काझी,फिनोलेक्स चे जनरल मॅनेजर तानाजी काकडे, आदी मान्यवर उपस्थित होते, सर्वच पाहुण्यांनी बशीरभाई हजवानी यांच्या सामाजिक शैक्षणिक आरोग्यदायी कार्याचे भरभरून कौतुक केले, आणि योग्य व्यक्तीला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्याबद्दल संयोजकांचे आभार मानले,बशीर भाई हजवानी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि कोणतेही कार्य करताना ते मनापासून करावे, देखावा नसावा,अल्ला सुभानहुताला नक्की मदत करतो असे म्हणाले, बशीर भाई हजवानी हे खास मुशायरासाठी रत्नागिरी ला आले होते,कारण ते मुशायरा प्रेमी आहेत,बशीर भाई कार्यक्रमा साठी उपस्थित राहिल्याबद्दल ऑल इंडिया मुशायरा कमिटीचे अध्यक्ष तथा वरिष्ठ पत्रकार आलिमियां काझी यांनी त्यांचे आभार मानले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या,बशीरभाई हजवानी यांना कोकण भूषण पुरस्कार दिल्याबद्दल पुरस्काराची शान वाढली असल्याचे अलिमियां काझी म्हणाले.

———————————————
*🏝️ माधवबाग🩺*

👉🏻अँन्जिओग्राफी,अँन्जिओप्लास्टी, बायपास सल्ला मिळालेल्या किंवा शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्ती, हृदयविकाराचा झटका येऊन गेलेल्या, तसेच मधुमेह, अतिरक्तदाब, – दम लागणे, छातीत दुखणे, पायाला सूज अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींसाठी….

*💉आरोग्य तपासणी शिबिर🩺*

*📆 दि.* १३, १४,१५,१६,१७मे २०२२

*🕙वेळ :-* सकाळी.१० ते सायं.०६

हृदयरोग, ब्लॉकेजेस, मधुमेह, स्ट्रेस रक्तदाब, लठ्ठपणा, कोलस्ट्रेरॉल तपासणी अंतर्गत हृदय तपासणी, हृदयाचे ठोके तपासणी, रक्तदाब, रक्तातील ऑक्सिजन प्रमाण तपासणी (TMT TEST) हृदयाची व्यायाम कार्यक्षमता तपासणी, ई. सी. जी, रँडम शुगर याशिवाय तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन दिले जाईल

*वरील सर्व तपासण्या-* फक्त 199/- मध्ये

🏝️माधवबाग नाव नोंदणीसाठी

*📱संपर्क:*

*कणकवली -*📱9373183888
*कुडाळ-📱* 9011328581

*सावंतवाडी-*📱7774028185

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!