क्रीडासामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

कोलगांव भोमवाडी प्रिमियर लिग २०२०-२१ क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 ब्युरो चीफ : विशाल पित्रे

🎴सावंतवाडी,दि.२५: कोलगांव इस्वटी कला क्रीडा मंडळ आयोजित भोमवाडी प्रिमियर लीग २०२०-२१ च्या क्रिकेट स्पर्धेला आज पासून प्रारंभ झाला.स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक व प्रमुख मानकरी अरुण  राऊळ यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन करण्यात आले.यावेळी लक्ष्मण गावडे,मोहन मठकर,प्रशांत पडते,प्रशांत सावंत,बाळा राऊळ,महेश चव्हाण,जर्नादन साईल,सुनिल राऊळ,साक्षी धोंड,जयवंत धोंड,माजी सैनिक.किरण सावंत,मधुकर बागवे,सुमित्रा राऊळ तसेच संघमालक प्रविण सावंत,संतोष राऊळ,बाळा राऊळ,संदेश राऊळ,राजन शिरोडकर,नाथा शिरोडकर आदी उपस्थित होते. गेली अनेक वर्षे यशस्वी रित्या ही क्रिकेट स्पर्धा घेण्यात येते यंदाही ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.उद्या ह्या स्पर्धेची सांगता होणार आहे उद्या सायंकाळी अंतिम सामना होणार असून लगेचच बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!