नैसर्गिक वायू गळती’विषयावर त्रिवेणी प्रसाद पेट्रोल पंपावर रंगीत तालीम सादर
*’नैसर्गिक वायू गळती’विषयावर त्रिवेणी प्रसाद पेट्रोल पंपावर रंगीत तालीम सादर*
सावंतवाडी, दि.११:- MNGL (Maharashtra Natural Gas Limited) मार्फत ‘नैसर्गिक वायू गळती’ या विषयावर आज सावंतवाडीतील त्रिवेणी प्रसाद पेट्रोल पंप येथे रंगीत तालीम घेण्यात आली.
MNGE (Maharashtra Natural Gas Limited) ही कंपनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नैसर्गिक वायूचा पुरवठा करीत असून सदर कंपनी मार्फत PNGRB (Petroleum and Natural Gas ) यांचेकडून मिळालेल्या निर्देशानुसार आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आलेला आहे. सदर आपत्ती व्यवस्थापन आराखड्याच्या अनुषंगाने रंगीत तालीम सावंतवाडीत घेण्यात आली..तरी सदर रंगीत तालीमिसाठी तहसिलदार राजाराम म्हात्रे, कंपनीचे अधिकारी,आपत्ती व्यवस्थापन चे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी संबंधितांना आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात आले.