शिरोड्यात डंपर कार अपघात सुदैवाने मालक-चालक बचावले
सुसाट डंपर मुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
शिरोडा :- शिरोड्यात मायनिंग चे डंपर सुसाट धावत असल्याने नागरिकांच्या व विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने पालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. तर शिरोड्यात डंपरच्या अपघाताची मालिका सुरूच आहे
चालू मायनिंग च्या हंगामामध्ये मायनिंग ची वाहतूक करणारे सुसाट डंपर शिरोड्यातून जात असल्याने शिरोडा तील नागरिक धुळीने हैरान होत आहेत.
तसेच डंपर चालकांच्या अरेरावीमुळे विद्यार्थी व नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाल्याने बारीक-सारीक अपघाताचे प्रमाण सुरूच आहे. आज सकाळी शिरोड्याच्या बाजारपेठेच्या हमरस्त्यावर एका चार चाकी कारला एका डंपरने जबरदस्त धडक दिल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामध्ये चार चाकी गाडीचा ड्रायव्हर व मालक बालंबाल बचावले आहेत. तसेच आता शाळा सुरू असल्याने विद्यार्थ्यांची ये-जा असल्याने डंपर सुसाट धावत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे सुद्धा जीवितास धोका निर्माण होऊ शकतो आज सकाळी दहाच्या दरम्यान शिरोडा बायपास येथे चार चाकी कार व डंपर चा अपघात झाला डंपर चालकाने चार चाकी गाडीला धडक दिली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
वाहतूक कोंडी झाल्याने डंपरची रांग लागली होती तसेच इतर वाहनांची कोंडी झाली होती मायनिंग ची वाहतूक डंपर द्वारे केली जात असल्याने डंपर सुसाट धावत आहेत त्यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत आहे. डंपर व चारचाकी कारचा अपघात झाल्यानंतर सुमारे तासभर वाहतूक कोंडी झाली होती त्यानंतर सदर प्रकरण डंपर मालकाने मिटवल्याचे समजले. खनिज मालाची वाहतूक ही डंपरच्या फेरीवर भाडेतत्त्वावर असल्याने डंपर चालक सुसाट डंपर हाकून फेऱ्या वाढवत आहेत. पहाटे साडेतीन ते चार वाजल्यापासून डंपरची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असल्याने सकाळ सत्रात व्यायाम करणे साठी जाणारे वयोवृद्ध सुद्धा डंपरच्या वाहतुकीमुळे घरा बाहेर फिरायला घाबरत आहेत. डंपर चा अपघात होताच डंपर चालक डंपर घेऊन ताबडतोब प्रसार होत असल्याने कुठल्या डंपर कडून अपघात झाला हे समजत नाही शिरोडा रस्त्याला डंपर शिवाय दुसरे वाहन सुद्धा दिसत नाही. राज्य परिवहन महामंडळाचे बसेसला जाण्यासाठी डंपर चालक बाजू देत नसल्याने प्रवाशांचाही खेळखंडोबा होत आहे तसेच प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत सध्या पर्यटन हंगाम सुरू असल्याने पर्यटक का च्या गाड्या मोठ्यासध्या पर्यटन हंगाम सुरू असल्याने पर्यटक का गाड्या मोठ्या प्रमाणात परिसरात दाखल झाल्याने त्यांनाही डंपर वाहतुकीचा सामना करावा लागत असल्याने पर्यटक तुन तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शिरोडातुन सुसाट जाणारे डंपरचा वेग कमी करावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.