आरोग्यकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

हातभार चारिटेबल ट्रस्टच्या नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ….९० लोकांनी घेतला शिबिराचा लाभ

🟥हातभार चारिटेबल ट्रस्टच्या नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ….९० लोकांनी घेतला शिबिराचा लाभ

🟥श्री म्हाळाईदेवी महिला मंडळचे मोलाचे योगदान

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 कार्यकारी संपादक :आनंद धोंड

🎴 सावंतवाडी,दि.२६: हातभार चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग यांच्या सौजन्याने आयोजक श्री म्हाळाईदेवी महिला मंडळ म्हाळाईवाडी तळवडे यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी ९० लोकांनी आपली नेत्रतपासणी करून घेतली यात १० लोकांची मोतीबिंदू शस्त्रक्रियामोफत करण्यात येणार असल्याचे हातभार चॅरिटेबल ट्रस्ट कडून सांगण्यात आले. तसेच ३ गरीब दुर्बल नागरिकांना मोफत चष्मा वाटप करण्यात येणार आहे.
मोफत नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन हातभार चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक खजिनदार श्री नयनेश गावडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तर ट्रस्टचे जिल्हाध्यक्ष श्री सुभाष साबळे यांनी प्रतिमेला श्री गणेशाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
हातभार चॅरिटेबल ट्रस्ट ही सामाजिक क्षेत्रात काम करत असून गरीब दुर्बल लोकांना म्हणजे किडनी ग्रस्त,कॅन्सर ग्रस्त,ब्रेन ट्यूमर यासारख्या दुर्धर आजारांनी पीडित, गरीब विद्यार्थी तसेच इतर विविध सामाजिक क्षेत्रात काम करण्याचे कार्य करते असे जिल्हाध्यक्ष सुभाष साबळे यांनी यावेळी बोलताना सांगितले तसेच हातभार चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आपण एकत्रित येऊन आपला गाव, शहर, तालुक्याचा विकास करुया असेही ते यावेळी म्हणाले. आजच्या शिबिरात साठी हातभार चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री शैलेश मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले असून ट्रस्टच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमासाठी योगदान दिले. तसेच शिबिरासाठी शुभांगी ऑप्टिशियन सावंतवाडीचे मोलाचे योगदान मिळाले.
यावेळी हातभार चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक सचिव श्री एकनाथ चव्हाण, संस्थापक खजिनदार श्री नयनेश गावडे, जिल्हाध्यक्ष श्री सुभाष साबळे,श्री म्हाळाईदेवी कलक्रीडा मंडळ अध्यक्ष श्री प्रवीण लोके,तळवडे व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष सुधीर गावडे, महिला सचिव सौ अस्मिता भराडी, सावंतवाडी तालुकाध्यक्ष नेहा काष्टे, तसेच श्री म्हाळाईदेवी महिला मंडळच्या सौ प्रांजल आचरेकर, सौ सुषमा गावडे, सौ अनुराधा सावंत, सौ. दिपाली हरमलकर, सौ. विशाखा आचरेकर, सौ. सुवर्णा गावडे, श्री धोंडू नागवेकर, प्रसाद गावडे, सुनील लोके, विकास गावडे, आदी मान्यवर,उपस्थित होते. तसेच या नेत्र तपासणी शिबिरासाठी शुभांगी ऑप्टिशनचे सावंतवाडी ऑपटॉमेट्रिक मालक सचिन हरमलकर व त्यांचे सहकारी विष्णू तेंडुलकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद गावडे यांनी केले.

———————————————
*🌴साई सावली क्लासेस🙏*
▪️आपणास कळविण्यात आनंद होतो की,आम्ही *सावंतवाडी,बिरोडकर टेंब सुर्वण काॅलनी येथे दत्ताराम शिरोडकर (विष्णू कृपा)🏡* यांच्या घरात साई सावली नावाने *👩🏻‍💼१ ली ते ७ वी 🧑🏻‍💼पर्यंत चे क्लास सुरू केले आहेत.*
तरी या सुवर्ण संधीचा बिरोडकर टेंब परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

*सौ,अन्वी आनंद धोंड*
*एम.ए.बी.एड*
*मो,९१४६७२९८९२/९४२३९५८८२८*

*🏢कोलगाव उच्च माध्यमिक विद्यालय कोलगाव*
आणि
*🏤कळसुलकर हायस्कूल मध्ये शिकवण्याचा अनुभव.*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!