कोकणराजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

तात्काळ दुरूस्ती करा; अन्यथा आंदोलन करू,अमित परबांचा इशारा…

 

सावंतवाडी,ता.२४: माजगाव नाला ते ओटवणे या रस्त्याची परिस्थिती अत्यंत खड्डेमय झाली आहे. त्यामुळे परिसरात जाणाऱ्या वाहनधारकांना व ग्रामस्थांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची तात्काळ डागडुजी करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करू असा इशारा ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपाचे पदाधिकारी अमित परब यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी माहीती दिली.ते म्हणाले, आपण बांधकामच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत वारंवार मागणी केली. परंतु दुर्लक्ष होत आहे. रस्त्याची परिस्थिती धोकादायक असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्याचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे तात्काळ याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!