टाईम लाईन ठरवा आणि चौपदरीकरणात जमिनी गेलेल्या लोकांचे प्रश्न सोडवा – भाजपा आमदार नितेश राणे
टाईम लाईन ठरवा आणि लोकांचे प्रश्न सोडवा अशी सुचना भाजपा आमदार नितेश राणे यांनी प्रांताअधिकारी वैशाली राजमाने यांना दिली
✍️प्रतिनिधी :- रविकांत जाधव
🎴कणकवली, ता.२४: चौपदरीकरणात जमिनी गेलेल्या लोकांचे प्रश्न आजही निकाली लागलेले नाहीत. निवाडे, मोबदला देण्याचे काम अजुनही दिरंगाईने चालु आहे. हे असे किती दिवस चालणार? टाईम लाईन ठरवा आणि लोकांचे प्रश्न सोडवा अशी सुचना भाजपा आमदार नितेश राणे यांनी प्रांताअधिकारी वैशाली राजमाने यांना दिली. मार्च पर्यंत ही सर्व प्रकरणे निकाली काढुन चौपदरीकरणातील जनतेचे प्रश्न सोडविले नाहीत, तर जनतेसाठी टोकाची भुमिका घ्यावी लागेल. असा इशाराही यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिला.
कणकवली तालुक्यातील महामार्ग चौपदरीकरणात जनतेच्या अडकलेल्या प्रश्नावर आज प्रांत कार्यलयात आमदार नितेश राणे यांनी प्रांताधिकारी यांच्या सोबत चर्चा केली. यावेळी जिल्हापरिषद बांधकाम सभापती बाळा जठार, सभापती दिलीप तळेकर, माजी सभापती रत्नप्रभा वळंजु, भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, नगरसेवक शिशीर परुळेकर, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, विभागीय अध्यक्ष सुर्यकांत भालेकर, तरेळे सरपंच साक्षी सुर्वे, उपसरपंच दिनेश मुद्रस, रूपाली भाम्बुरे, संकेत खानविलकर, शैलेश सुर्वे आणि ग्रामपंचयत सदस्य उपस्थित होते.

