सावंतवाडीच्या मुख्याधिकारी पदी पुन्हा जयंत जावडेकर यांची नियुक्ती
उद्या स्वीकारणार पदभार ..तर संतोष जिरगे यांची मालवणला बदली
सावंतवाडी नगरपालिकेत असताना पारदर्शक स्वच्छ कारभार करणारे मुख्याधिकारी जयवंत जावडेकर यांची मालवण येथे बदली झाली होती. मात्र त्यांच्या जागी हजर झालेले मुख्याधिकारी संतोष जिरगे हे अल्पावधीतच वादग्रस्त ठरल्याने त्यांना पुन्हा मालवणला पाठवून जयंत जावडेकर यांना सावंतवाडीचे मुख्याधिकारी म्हणून पुन्हा पाठविण्यात आले आहे.
सावंतवाडीच्या मुख्याधिकारी पदी नियुक्ती झाल्यापासून स्वच्छ व पारदर्शक कारभार व गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम जयंत जावडेकर यांनी केले होते. मात्र त्यांची अचानक बदली मालवण येथे झाली होती. ही बदली का झाली? कोणी केली?कशी झाली? याबाबत सत्ताधारी नगरसेवकांना ही माहिती नव्हते. व याचे कारण मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनाही समजले नव्हते. मात्र नेमणूकीच्या ठिकाणी हजर होऊन आपल्या कामाचा ठसा मालवण नगरपालिकेत ही जयंत जावडेकर यांनी उठवला होता,व विरोधी पक्षांनी जावडेकर यांच्या चांगल्या कामाचे कौतुक करून त्यांचा गौरव केला,मात्र सावंतवाडी त्यांच्या जागी नगरविकास खात्यातून आलेले संतोष जिरगे यांनी सावंतवाडी मुख्याधिकारी पदाचा कार्यभार हाती घेतल्या पासूनच वादग्रस्त झाले होते, सत्ताधारी नगरसेवकांना विश्वासात न घेणे त्यांच्याशी उद्धट वर्तन करणे कोरोना काळात सावंतवाडी सोडून मुख्यालयाच्या ठिकाणी थांबणे या कारनांमुळे ते वादग्रस्त बनले होते,अखेर त्यांची बदली मालवण येथे होऊन त्यांच्या जागी पुन्हा एकदा जावडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीने सावंतवाडीतील नागरिकात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

