दत्तजयंतीचे शास्त्र समजून आचरण फलदायी : शरद राऊळ
हिंदु जनजागृती समितीचा ऑनलाइन धर्मशिक्षण वर्ग
ब्युरो न्युज- कोकण लाईव्ह ब्रेकिंग
सावंतवाडी – शास्त्र समजून घेऊन धर्माचरण योग्यरित्या केल्यास अधिक फलप्राप्ती मिळते. त्यामुळे दत्ताच्या उपासनेत अंतर्भूत असलेल्या विविध कृती करण्याच्या योग्य पद्धती आणि त्यांचे शास्त्र यांविषयी समाजाला धर्मशिक्षण देण्याचा यथाशक्ती प्रयत्न करणे, ही दत्तभक्तांसाठी काळानुसार आवश्यक अशी श्रेष्ठ स्तराची समष्टी साधना आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे श्री. शरद राऊळ यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धर्मप्रेमीसाठी दि. २० डिसेंबर २०२० या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षण वर्गाचे आयोजित करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या व्याख्यानाचे सूत्रसंचालन श्री. भरत राऊळ यांनी केले.
श्री. शरद राऊळ यांनी जोडलेल्या सर्व धर्मप्रेमींना दत्त जयंती विषयी सविस्तर माहिती सांगितली. दत्त जयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्रसप्ताह असे म्हणतात. भजन, पूजन आणि विशेषकरून कीर्तन वगैरे भक्तीचे प्रकार प्रचारात आहेत. महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते. तामिळनाडूमध्येही दत्त जयंतीची प्रथा आहे. दत्त जयंती या दिवशी काही ठिकाणी दत्तयाग केला जातो.बहुतांश हिंदूंना आपल्या देवता, आचार, संस्कार, सण आदींविषयी आदर आणि श्रद्धा असते; परंतु त्यांच्या उपासनेमागील धर्मशास्त्र ठाऊक नसते.
दत्ताच्या किंवा अन्य मंदिरात दर्शनासाठी झुंबड करू नये. ओळीने अन् शांतपणे दर्शन घ्यावे. शांतपणे भावपूर्ण दर्शन घेतल्यानेच दर्शनाचा खरा लाभ होतो.
आज समाजामध्ये धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था कुठेही नाही. आपल्याला धर्म आणि शौर्य यांचे शिक्षण घेण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. स्वतःमध्ये तेज निर्माण करण्याचे सामर्थ्य केवळ धर्माचरण आणि स्वरक्षण यांमध्येच आहे, धर्मशिक्षणा अभावी हिंदू समाज वेगळ्या दिशेने चालला आहे.भारतीय संस्कृतीचे आचरण करणे, यज्ञयाग आणि नामजपाचे महत्त्व संपूर्ण जगाला कळले. त्यामुळे सर्वजण हात जोडून नमस्कार करायला लागले. त्याचसमवेत स्वत:मध्ये शौर्यजागृत करणेही महत्त्वाचे आ