कोकणसावंतवाडीसिंधुदुर्ग

भोंसले नाॕलेज सिटीचे” सर्वेसर्वा रो.अच्युत सावंत भोसले यांना रोटरी क्लब तर्फे वाढदिनी शुभेच्छा…

*सावंतवाडी दि.१४-:* वाढदिवस हे सर्वांचेच साजरे होतात. परंतु, एखाद्या वाढदिवस हा वेगळा असतो. “भोंसले नाॕलेज सिटीचे” सर्वेसर्वा रो.अच्युत सावंत भोसले यांचा वाढदिवस आज मॕनेजमेंट टेक्निक यादृष्टीने साजरा केला गेला. वाढदिवसाच्या निमित्याने रो.अच्युत भोसले यांना उपाध्यक्ष रो.दिलीप म्हापसेकर यांच्या हस्ते बुके देण्यात आला. यावेळी यंदाचे रोटरी क्लब, सावंतवाडीचे “सुवर्ण महोत्सवी वर्ष” शिस्तबद्ध पद्धतीने कसे साजरे करता येईल. यासाठी नियोजन आणि अंमलबजावणी यावर रोटरीचे पब्लिक इमेज डायरेक्टर म्हणून रो.अच्युत सावंत भोसले यानी मार्गदर्शन केले.

यावेळी रोटरी अध्यक्ष रो.साईप्रसाद हवालदार यानी त्याना वाढदिवसा निमित्य आणि भावी वाटचालीसाठी आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यानी घेतलेल्या भरारी साठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी कोविडच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस छोट्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्ष रो.साईप्रसाद हवालदार उपाध्यक्ष रो.दिलीप म्हापसेकर आणि सचिव रो.CA. सुधीर नाईक उपस्थितीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!