कोकणराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी तालुक्यात आज कोलगांव मधून तीन अर्ज दाखल

 

सावंतवाडी,दि.२३ : तालुक्याच्या ११ ग्रामपंचायत निवडणूक येत्या १५ जानेवारीला होऊ घातल्या आहेत.आज पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे.
पहिल्या दिवशी कोलगाव ग्रामपंचायत निवडणुकीकरिता आज तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
ग्रामपंचायत निवडणुकीकरिता २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. आज पहिल्या दिवशी कोलगाव ग्रामपंचायती करिता प्रभाग क्र.१ मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला याजागेसाठी प्रतिक्षा धुरी, सर्वसाधारण जागे साठी कुलदीप राऊळ तर सर्वसाधारण महिला या जागेसाठी सरिता सावंत या तिघांनी अर्ज दाखल केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!