कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

उभा बाजार परिसरातील पाणी प्रश्न अखेर मार्गी

नगराध्यक्ष संजू परब यांनी दिलेला शब्द पाळला.. समीर वंजारी

सावंतवाडी, दि. २३ : सावंतवाडीत पाणी वाद अधिक पेटण्याची शक्यता असताना नगराध्यक्ष संजू परब यांनी उभा बाजार येथील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. नगराध्यक्षांनी यापुढे या भागात नियमित पाणी येणार असल्याची ग्वाही दिली त्यानुसार काल पहिल्यांदाच दुपारी ३.४५ पासून ४.३० पर्यंत उभा बाजार परिसरात बारीक का होईना परंतु पाणी आल्यानं काँग्रेसचे सावंतवाडी उप तालुकाध्यक्ष समीर वंजारी आणि येथील रहिवाशांनी समाधान व्यक्त केल..
सावंतवाडी उभा बाजार इथ सोमवारी दिवसभर पाणीच आलं नव्हतं. त्यामुळे नागरिक चांगलेच संतापले होते. नागरिकांना वेळेत मुबलक पाणीपुरवठा करण हे नगर पंचायतीचं प्रथम कर्तव्य असून मंगळवारपर्यंत हा पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर नगरपंचायतीसमोर उभा बाजार येथील सर्व रहिवासी आंघोळ आंदोलन छेडणार असल्याचा इशारा काँग्रेसचे सावंतवाडी उप तालुकाध्यक्ष समीर वंजारी यांनी दिला होता. त्यानुसार नगर पंचायतीची बैठक होवून नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. तेथील परिस्थितीचा आढावा घेवून यापुढे नियमित पाणी येणार असल्याची ग्वाही दिल्यानं हा पाणी प्रश्न मिटला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!