“स्त्री राजसत्ता प्रतिष्ठान” आणि टाळबां अस्मिता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अगरबत्ती प्रशिक्षण’ कार्यक्रमाचे आयोजन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : साईश गावडे
🎴सावंतवाडी,दि.२३: “स्त्री राजसत्ता प्रतिष्ठान” आणि टाळबां अस्मिता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अगरबत्ती प्रशिक्षण’ या कार्यक्रमाच्या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन सावंतवाडीतील आर.पी.डी. हायस्कुल येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन व प्रमुख मार्गदर्शन टाळबां अस्मिता फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. शशांक दळवी यांनी केले.
कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी डॉ. दळवी यांनी अगरबत्ती उद्योगाची एकूण बाजारपेठ व ह्या उद्योगातून होणारे स्त्रियांचे आर्थिक सक्षमिकरण यावर मार्गदर्शन केले. आयुर्वेदिक अगरबत्ती आणि त्याच्या घटकांबाबतचा व्यासायिक दृष्टीकोन समजावून सांगितला. एकटीने आणि समूहाने हा व्यवसाय कसा होऊ शकतो? हे देखील विशद केले.
स्त्री राजसत्ता प्रतिष्ठानच्या अध्यक्षा जान्हवी सावंत यांनी संघटनेकडून एक पाऊल सबलीकरणाकडे या घोषवाक्याचा पूनरुचार करत येत्या काळात संस्था या क्षेत्रात स्वतःचा ब्रँड निर्माण करून महिलांना जास्तीतजास्त रोजगार देण्यासाठी प्रयत्नशील राहील असे प्रतिपादन केले.
स्त्री राजसत्ता संस्थेच्या उपाध्यक्षा ऍड.निता सावंत यांनी भविष्यात गृह उद्योग आणि त्याचे प्रशिक्षण ह्यावर संस्था कार्य करणार आहे त्याची सुरुवात आज पासून करीत आहोत. अगरबत्ती निर्मितीच्या गृह उद्योगात स्त्रीयांना प्रशिक्षण, त्याची निर्मिती आणि पुढे त्याचे ‘ब्रँडिंग’ व मार्केटिंग पर्यंत प्रतिष्ठान आणि बहुउद्देशीय संस्था काम करणार आहे. असे सांगितले.
कार्यक्रमाचे निवेदन संस्थेच्या सहसचिव अपर्णा कोठावळे यांनी केले. यात २५ महिलांना अगरबत्ती बनवण्याचे प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्त्री राजसत्ता प्रतिष्ठान च्या उपाध्यक्षा ऍड.निता सावंत-कवीटकर आणि सह-सचिव सौ.अपर्णा कोठावळे यांनी तसेच स्त्री राजसत्ता बहुउद्देशीय सह.संस्थेच्या रश्मी माळवदे, शिवानी पाटकर, समीरा खलील, रुपाली चव्हाण यांनी नियोजन केले. कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्ष जान्हवी सावंत, नगरसेविका दीपाली सावंत, माधुरी वाडकर उपस्थित होत्या.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

