सावंतवाडी नगरपरिषदेच्या मासिक बैठक शिवसेना आणि भाजपा नगरसेवकांत खडाजंगी*
*▪️ सावंतवाडी नगरपरिषदेच्या मासिक बैठक शिवसेना आणि भाजपा नगरसेवकांत खडाजंगी*
*🖥️ Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी:-प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी,दि,:-२१*
सावंतवाडी संस्थानचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत बापूसाहेब महाराज यांचे नाव काॅलेज प्रवेशद्वार चौकाला द्यावे या मागणीवर शिवसेना नगरसेविकानी आग्रही भूमिका मांडली तर नगराध्यक्ष संजू परब यांनी बापूसाहेब महाराज, शिवराम राजे भोसले यांचे पुतळे आहेत त्यामुळे या चौकाला धर्मवीर छत्रपती संभाजीराजे चौक नामकरण करण्यास मंजुरी दिली. या विषयावर सभेत शिवसेना आणि भाजपा नगरसेवकात खडाजंगी उडाली.
सावंतवाडी नगरपरिषदेची मासिक सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष संजू परब यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शिवसेनेच्या महिला बालकल्याण उपसभापती भारती मोरे यांनी आपल्या प्रभागांमध्ये पाणी येत नसल्याची तक्रार केली असता हा आयत्या वेळचा विषय होऊ शकत नाही असे सांगत नगराध्यक्ष संजू परब यांनी सभा संपल्याचे जाहीर करून तडक ते आपल्या नगराध्यक्ष कक्षांमध्ये निघून गेले त्यानंतर शिवसेना नगरसेवकांनी जोरदार हंगामा केला आम्ही विचारलेल्या प्रश्नाला उत्तर न देता नगराध्यक्ष संजू परब यांनी सभात्याग केल्याबद्दल शिवसेनेच्या नगरसेवकानी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली
या सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा यांचे नाव कॉलेज कॉर्नर चौकाला देण्यात यावे असा ठराव मांडला असता छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव यापूर्वी शिरोडा नाका चौकाला देण्यात आले असून या चौकाला हिज हायनेस पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांनी केली या मागणीला गटनेत्या अनारोजीन लोबो यांनी समर्थन दिले.
यावर बोलताना नगराध्यक्ष संजू परब म्हणाले पाच वर्षे चार महिने उलटून गेले तरी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाची पाटी तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी शिरोडा नाका चौकात लावू शकलेले नाहीत महाराजांचे स्वराज्यामध्ये अतुलनीय पराक्रम असून त्यांच्या नावाची पाटी लावण्यास इतका वेळ का लागला असा सवाल केला तर सावंतवाडी संस्थानचे पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांचा पुतळा शहरांमध्ये आहेत तसेच संस्थानचे राजे शिवराम राजे भोसले यांचाही पुतळा उभारण्यात आलेला आहे त्यामुळे या चौकाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा ठराव त्यांनी मांडला.
पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांच्या नावाला आक्षेप आहे काय ? असा सवाल बांदेकर यांनी केला या चर्चेमध्ये आरोग्य व क्रीडा सभापतींनी सधीर आडिवरेकर, नासिर शेख,आनंद नेवगी यांनी सहभाग घेतला यावेळी लोबो यानी छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाला आमचा विरोध नाही कोणाचाच विरोध असण्याचे कारण नाही मात्र श्री पंचम खेमराज महाराज महाविद्यालय हे बाजूला असून या चौकाला त्यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली अखेरीस या चौकाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा ठराव संमत करण्यात आला.
या विषयावर बोलताना नगरसेवक डॉ जयेंद्र परुळेकर यांनी मुलींना शिक्षणासाठी ज्यानी संघर्ष केला अशा सावित्रीबाई फुले यांचे नाव सावंतवाडी शहरांमध्ये कुठेच दिसत नाही त्यांच्या नावाने एखादा चौक असावा असे मत व्यक्त केले तर नगरसेविका दीपाली भालेकर यांनी सावंतवाडी शहरातील भटवाडी येथील श्री देव महापुरुष देवस्थान कडे जाणाऱ्या भागाला महापुरूष नगर हे नाव देण्यात यावे अशी मागणी केली ही मागणी नगराध्यक्ष परब यांनी मान्य केली
सावंतवाडी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा कोरोना च्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आली मात्र नगरपरिषदेच्या लोकमान्य टिळक सभागृहात आँफलाईन पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष संजू परब मुख्याधिकारी जयंत जावडेकर आरोग्य क्रीडा सभापती सुधीर आडिवरेकर महिला व बालकल्याण सभापती दिपाली सावंत उपसभापती भारती मोरे शिवसेना गटनेते अनारोजीन लोबो उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर नगरसेवक आनंद नेवगी मनोज नाईक डॉ जयेंद्र परुळेकर समृद्धी विर्नोडकर उत्कर्षा सासोलकर दिपाली भालेकर आदी उपस्थित होते
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FiUpx9Y03kdHjAHlJAYwkX
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

